रवीना टंडनचा दारु पिऊन धिंगाणा? वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप Video

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन ही सध्या वादाच्या भोवऱ्यात(woman) अडकली आहे. शनिवारी (1 जून) रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात काही लोकांना मारहाण केल्याचा आरोप रवीनावर करण्यात आला आहे. या प्रकरणी काही स्थानिकांनी रवीनाला घेरले आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रवीनावर(woman) गंभीर आरोप करताना देखील दिसत आहे. तो व्यक्ती म्हणतो की, “मी वांद्रे येथे राहतो. माझी आई, बहिण आणि भाची या तिघी रवीना टंडनच्या घराजवळून येत होत्या. त्यावेळी रवीनाचा ड्रायव्हर गाडी चालवत होता.

त्या गाडीनं माझ्या आईला टक्कर दिली. त्या ड्रायव्हरनं माझ्या भाचीला मारलं, आईला मारलं. त्यानंतर रवीना टंडन ही दारुच्या नशेत आली. तिनं देखील माझ्या आईला मारलं. माझ्या आईच्या डोक्याला दुखापत झाली आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो. पण इथे आमचं कुणी ऐकत नाहीये. आपण मांडवली करु, असं ते म्हणत आहेत.”

“तुला तुरुंगात रात्र काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येत आहे.” असं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला रवीनाला म्हणताना दिसत आहे.

https://twitter.com/i/status/1796997125449842726

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रवीना ही लोकांना व्हिडीओ रेकॉर्ड न करण्याची विनंती करत आहे आणि स्थानिकांनी तिच्यावर हल्ला करत आहे. रवीना ही व्हिडीओमध्ये म्हणताना ऐकू येते, “धक्का मारू नका. कृपया मला मारू नका.”

हेही वाचा :

भाजपचं फसलेलं राजकारण?

मोठी बातमी! ‘या’ राज्यात पान मसाल्यासह तंबाखूच्या विक्रीवर बंदी, नियम मोडल्यास तुरुंगात रवानगी

देशात येणार इंडिया आघाडीचे सरकार, संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेचा दिला असा आकडा