लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा शनिवारी पार पडला(delhi). आता सर्वांनाच 4 जून रोजीच्या निकालाची उत्सुकता आहे. तत्पुर्वी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दर्शवले आहे.
शाहू महाराज छत्रपती आणि खासदार संजय मंडलिक यांच्यातील दुरंगी लढतीत महाविकास(delhi) आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे एक्झिट पोलनुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयाचे दावेदार ठरत आहेत. तर महायुतीमधील भाजपचे खासदार संजय मंडलिक पिछाडीवर पडल्याचे एक्झिट पोल मध्ये दिसून आले आहे.
कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे पहिल्यांदाच सार्वजनिक लोकसभा निवडणुकीत उतरल्यानंतर कोल्हापूर लोकसभेची लढत तुल्यबळ बनली होती. खासदार संजय मंडलिक हे दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांचे नाव एक्झिट पोलनुसार आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. राज्यातील सत्तापालटानंतर राज्यातील सर्वच पक्षात खळबळ माजली. त्यातच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. तर त्यांच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट, आरपीआय यांनी एकत्रित महायुतीची मोट बांधली व लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. आता मतदानाचे सर्व टप्पे झाले असून केवळ निकालाची सर्वांनी प्रतीक्षा आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांचे नाव एक्झिट पोलनुसार आघाडीवर असल्याचे समोर येते. खासदार संजय मंडलिक यांच्याबाबत असणारी नाराजी, कमी जनसंपर्क, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनता काही अंशी नाराज असल्याचे सांगितले जाते. अशातच शाहू महाराज छत्रपती हे राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज असल्याने त्यांच्याप्रती असणारा आदर आणि अस्मिता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने कौल दिल्याचे दिसत आहे.
शिवाय काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांचे मिळालेले पाठबळ हे शाहू छत्रपतींसाठी महत्वाचे ठरल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात चार जून रोजी मतमोजणी होणार असली तरी एक्झिट पोल नुसार शाहू महाराज छत्रपती हे विजय होतील असे एक्झिट पोलनुसार दिसत आहे.
हेही वाचा :
रवीना टंडनचा दारु पिऊन धिंगाणा? वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप Video
देशात येणार इंडिया आघाडीचे सरकार, संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेचा दिला असा आकडा
सुईत धागा ओवणं ते झाडू मारणं…; वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा मम्मीकडून घेतोय खास ट्रेनिंग : Video