इचलकरंजीत कोयता हल्लाप्रकरणी सहाजणांवर गुन्हा!

गुन्हेगारी प्रमाणात भरपूर वाढ होत चालल्याचे चित्र आपणाला पहावयास मिळतच आहे. इचलकरंजी(attack) गावभागातील ढोले पाणंद रस्त्यावर हत्ती गवत लावण्याच्या कारणावरून दोघांवर दगड, विटांसह कोयता हल्ला झाल्याने दोघे जखमी झाले.याप्रकरणी शिवाजी शंकर ढोले (वय ५०), सौरभ शिवाजी ढोले (३०), अविनाश पडियार यांच्यासह सहाजणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

यातील रेकॉडवरील(attack) गुन्हेगार सौरभ ढोले याला अटक केली असून त्याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबतची फिर्याद शुभम रमेश पाटील (२१) यांनी पोलिसांत दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढोले पाणंद येथे महादेव पाटील यांनी शिवाजी ढोले यांना तुम्ही रस्त्यावर हत्ती गवत लावू नका, असे सांगितले. यातून दोघांत वाद झाला.

याठिकाणी शिवाजी यांचा मुलगा सौरभ ढोले, अविनाश पडियार यांच्यासह सहाजणांनी शुभम पाटील आणि महादेव पाटील यांना दगड, विट फेकून मारहाण केली. तसेच, सौरभ याने कोयत्याने वार केल्याने शुभम पाटील जखमी झाला. जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी शुभम पाटील याच्या फिर्यादीनुसार सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

चुकीला माफी नाहीचं! डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका

जान्हवी कपूरचा जबरा फॅन! अभिनेत्रीसाठी पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक

‘रोहित, विराटने भारतीय संघाला अपंग केलं’; माजी भारतीय दिग्गजाचं धक्कादायक विधान