लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी शिवसेना ठाकरे गटाला(political)मोठा धक्का बसला आहे. मुंबईमधील मतदानादिवशी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकांचे (political)मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची केंद्रिय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. मतदान काळात पत्रकार परिषद घेत आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश आता केंद्रिय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
मुंबईसह राज्यातील १३ लोकसभा मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान झाले. या मतदानादरम्यान मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी मतदान संपायला १ तास बाकी असताना पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मतदानाला होणाऱ्या विलंबावरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबतची तक्रार दिली होती. तसेच राज्य निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेचा अहवाल केंंद्रिय निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. यावरुनच आता केंद्रिय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा :
इचलकरंजीत कोयता हल्लाप्रकरणी सहाजणांवर गुन्हा!
‘रोहित, विराटने भारतीय संघाला अपंग केलं’; माजी भारतीय दिग्गजाचं धक्कादायक विधान
जान्हवी कपूरचा जबरा फॅन! अभिनेत्रीसाठी पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक