कोल्हापूरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कारने चार वाहनांना जोरदार(Video) धडक दिली. त्यानंतर या कारने चौघांना चिरडले. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरच्या सायबर चौक परिसरामध्ये ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर(Video) शहरातील सायबर चौक परिसरात ही अपघाताची घटना घडली. चौकामधून रस्त्या ओलांडत असताना भरधाव कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील काही जण चेंडूसारखे दूरवर फेकले गेले. हा थरकाप उडवणारा अपघात चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चारही दुचाकींसह कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या ६ ही जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू झाला आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत कोयता हल्लाप्रकरणी सहाजणांवर गुन्हा!
सांगली : माझ्या पायलटने दिशा ठरवल्यामुळे शक्य झाले’ विशाल पाटलांना विजयाचा विश्वास!
ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश