कोल्हापूर(Kolhapur) लोकसभा मतदारसंघ कोल्हापुरकरांनी अखेर मत आणि मान गादीलाच दिला आहे. शाहू महाराज छत्रपती विजयाच्या मार्गावर आहेत. त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावर लीड घेतली. शाहु महाराज आतापर्यंत ७० हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ३ लाख ७ हजार १८१ मते मिळाली आहेत. तर संजय मंडलिक यांना २ लाख ३७ हजार ५९४ मते मिळाली.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर(Kolhapur) महत्त्वाचा मतदारसंघ आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा हॉट सीट राहिली, याला कारण आहे काँग्रेसचे उमेदवार. या जागेवर काँग्रेसकडू छत्रपती शिवाजी महाराजांचे १२वे वंशज शाहू महाराज छत्रपती मैदानात होते. तर संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा महायुती अर्थात एनडीएने उमेदवारी दिली होती.
कोल्हापूर मतदारसंघात ७१.५९ टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यांत मतदान होण्याच्या सरासरीत कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. वाढीव मतदानात कोल्हापुरातील चंदगड आणि करवीर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
यामध्ये कोल्हापुरात ७१.५९ टक्के तर हातकणंगलेसाठी ७१.११ टक्के मतदान झाले. करवीर तालुक्यात सर्वाधिक ७९.६१, त्याखालोखाल कागल तालुक्यात ७५.३१ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ६५.३१ इतके झाले. हातकणंगलेसाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७५.३२ तर शाहूवाडी, शिरोळ मतदारसंघांत ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांत २०१९ च्या तुलनेत एक टक्क्याने मतदान वाढले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोल्हापुरकरांनी अखेर मत आणि मान गादीलाच दिला आहे. शाहू महाराज छत्रपती विजयाच्या मार्गावर आहेत. त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावर लीड घेतली. शाहु महाराज आतापर्यंत ७० हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ३ लाख ७ हजार १८१ मते मिळाली आहेत. तर संजय मंडलिक यांना २ लाख ३७ हजार ५९४ मते मिळाली.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर महत्त्वाचा मतदारसंघ आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा हॉट सीट राहिली, याला कारण आहे काँग्रेसचे उमेदवार. या जागेवर काँग्रेसकडू छत्रपती शिवाजी महाराजांचे १२वे वंशज शाहू महाराज छत्रपती मैदानात होते. तर संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा महायुती अर्थात एनडीएने उमेदवारी दिली होती.
कोल्हापूर मतदारसंघात ७१.५९ टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यांत मतदान होण्याच्या सरासरीत कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. वाढीव मतदानात कोल्हापुरातील चंदगड आणि करवीर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
यामध्ये कोल्हापुरात ७१.५९ टक्के तर हातकणंगलेसाठी ७१.११ टक्के मतदान झाले. करवीर तालुक्यात सर्वाधिक ७९.६१, त्याखालोखाल कागल तालुक्यात ७५.३१ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ६५.३१ इतके झाले. हातकणंगलेसाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७५.३२ तर शाहूवाडी, शिरोळ मतदारसंघांत ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांत २०१९ च्या तुलनेत एक टक्क्याने मतदान वाढले आहे.
कोल्हापूर- २०१९ मध्ये झालेले मतदान
पुरुष – ६ लाख ३५हजार ३२७
स्त्री – ५ लाख ९२ हजार २७७
तृतीयपंथी – २
एकूण – १२ लाख २७ हजार ६०६
कोल्हापूर- २०२४ मध्ये झालेले मतदान
पुरुष – ९ लाख ८४ हजार ७३४
स्त्री – ९ लाख ५१ हजार ५७८
तृतीयपंथी – ९१
एकूण -१९ लाख ३६ हजार ४०३
कोल्हापूर लोकसभेतील विधानसभेची परिस्थिती –
कोल्हापुरात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. चंदगड, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, राधानगरी.
करवीर मधून काँग्रसचे पी एन पाटील आमदार होते. त्या नुकतेच निधन झाले आहे. दक्षिण कोल्हापूरमधून काँग्रसचे ऋतुराज पाटील आमदार आहे. उत्तरमध्ये देखील काँग्रेस आमदार जयश्री जाधव प्रतिनिधित्व करतात. तर कागलमध्ये अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आमदार आहेत. चंदगड विधानसभेत अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार आहेत. राधानगरीत प्रकाश आबिटकर आमदार आहेत. जे शिंदे गटाचे आहे.
काँग्रेस १० वेळा मिळवला आहे विजय
१९५२ मध्ये कोल्हापूर(Kolhapur) लोकसभा मतदारसंघासाठी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. ही जागा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होती. काँग्रेसने येथून १० वेळा विजय मिळवला आहे. या जागेवरून काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड सर्वाधिक ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्याचवेळी सदाशिवराव मंडलिक हे तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले. ते एकदा काँग्रेसचे, दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एकदा अपक्ष म्हणून खासदार झाले आहेत.
काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड ५ वेळा विजयी –
१९५२ मध्ये काँग्रेसचे रत्नाप्पा कुंभार या जागेवरून खासदार झाले. १९५७ मध्ये भाऊसाहेब महागावकर येथून निवडून आले. त्यांनी किसान आणि मजूर पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. १९६२ मध्ये काँग्रेसचे व्ही.टी.पाटील, १९६७ मध्ये काँग्रेसचे शंकरराव माने आणि १९७१ मध्ये राजाराम निंबाळकर यांनी निवडणूक जिंकली. १९७७ मध्ये दाजीबा देसाई भारतीय किसान आणि मजूर पक्षाचे खासदार झाले. त्यानंतर १९८०, १९८४, १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी सलग 5 वेळा काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक जिंकली.
सदाशिवराव मंडलिक ४ वेळा खासदार-
१९९८ मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसकडून(Kolhapur) निवडणूक लढवली आणि विजयी झाले. १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्याच पक्षाकडून 1999 आणि २००४ मध्ये पुन्हा निवडणूक जिंकली. २००९ मध्ये सदाशिवराव अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजयी झाले. त्यानंतर २०१४ मध्ये धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक जिंकली. संजय मंडलिक यांनी २०१९ साली या जागेवर पुन्हा एकदा शिवसेनेला विजय मिळवून दिला.
हेही वाचा :
मोदींची गॅरंटी, मंगळसूत्र, टेम्पो आणि बरंच काही…; यंदाची लोकसभा याच मुद्द्यांवर गाजली!
सांगलीत विशाल पाटील आघाडीवर, निकालाआधीच कार्यर्त्यांनी जल्लोष करत उधळला गुलाल
‘मोदींच्या निरोप समारंभाची तयारी सुरू’, निकालाच्या पहिल्या कलानंतर संजय राऊतांची फटकेबाजी!