कॅप्टन रोहित शर्माचं दमदार अर्धशतक अन् उपकर्णधार हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला अन् यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (world ) पहिला विजय नोंदवला.
टी20 वर्ल्ड कपचा आठवा सामना भारत आणि आयर्लंड दरम्यान खेळवला गेला. दोन्ही संघांसाठी सलामीचा असणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडने दारूण पराभव केला आहे. भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला अन् यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (world ) पहिला विजय नोंदवला आहे. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्माने अर्धशतक ठोकलं तर व्हाईस कॅप्टन हार्दिक पांड्याने 3 विकेट्स घेतल्या.
आयर्लंडने दिलेलं 97 धावांचं लक्ष्य टीम इंडियासाठी किरकोळ होतं. त्यामुळे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली आरामात सामना खेचतील, अशी आशा होती. मात्र, विराट कोहली केवळ एक धाव करत बाद झाला. मात्र, रोहितने टीम इंडियाचा गाडी विजयाच्या दिशेने नेली. रोहित शर्माच्या हाताला बॉल लागल्याने रोहित अर्धशतक ठोकल्यानंतर मैदानाबाहेर गेला. तोपर्यंत टीम इंडिया विजयाच्या उंभरठ्यावर होती. उर्वरित काम ऋषभ पंत, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी पूर्ण केलं.
भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा संघ 100 धावांच्या आत गारद झाला. आयर्लंडला केवळ 96 धावा करता आल्या. भारतातर्फे हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने एक-एक विकेट घेतली. आयर्लंडकडून गॅरेथ डेलेनीने 14 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली.
दरम्यान, आता टीम इंडियाचा आगामी सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणारा आहे. येत्या 9 जून रोजी हा सामना खेळवला जाणार आहे.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (C), विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन) : पॉल स्टर्लिंग (C), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (WK), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
हेही वाचा :
CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार!
कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ वादातून वृद्ध आईचा मुलाने केला खून