महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; हायअलर्ट जारी

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सांगली, सोलापूरच्या विविध भागांत वादळी पाऊस(rain) पडला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवस राज्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा(rain) इशारा देण्यात आला असून यलो अल्रर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

‘मॉन्सून’चे महाराष्ट्रातील आगमन काही तासांवर येऊन ठेपले आहे. गोव्यात दाखल होत मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. उद्या (ता. ६) मोसमी वारे तळकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यांत दाखल होण्याची शक्यता आहे.

तर १० जूनपर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

हेही वाचा :

तिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी;

भाजपला कोणी हरवू शकत नाही हा गैरसमज मोडून काढला, उद्धव ठाकरे

टीम इंडियाने फोडला विजयाचा नारळ, आयर्लंडचा पराभव T20 ‘श्रीगणेशा’