घटस्फोटाच्या चर्चेनंतर नताशाची ‘ती’ पोस्ट व्हायरल, हार्दिकच्या पत्नीला नेमकं काय म्हणायचंय?

सध्या टीम इंडिया क्रिकेटच्या महाकुंभात म्हणजेच(postal service) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये आपली ताकद दाखवत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन हार्दिक पांड्या याने 3 विकेट्स घेतल्या अन् दमदार विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्या पुन्हा फॉर्ममध्ये आला असला तरी गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या त्याच्या खासगी वादामुळे चर्चेत होता. हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. याची पुष्टि झालेला नाही, पण सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चेने वेग धरला होता. अशातच आता नताशाची पोस्ट व्हायरल होत आहे.

नताशाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पती हार्दिक पांड्यासोबतच्या(postal service) लग्नाचे सर्व फोटो काढून टाकले होते. एवढंच नाही तर नताशाने पांड्याचं आडनाव देखील काढून टाकलं होतं. नताशा आणि हार्दिक लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता नताशाने हार्दिकसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

नुकतंच नताशा स्टॅनकोविकने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केला आहे. यामध्ये नताशाने पाळीव कुत्र्याचा फोटो शेअर केलाय. ‘बेबी रोव्हर पांड्या’ असं कॅप्शन नताशाने दिलंय. नताशाने शेअर केलेल्या या फोटोमुळे आता दोघांमध्ये सर्वकाही अलबेल असल्याची बोललं जातंय.

काही दिवसांपूर्वी नताशा स्टेनकोविकने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यात ती आपला मुलगा अगस्तबरोबर दिसली. या स्टोरीला तीने एक इंग्लिश गाणं जोडलं होतं. याशिवाय तीने आणखी दोन स्टोरीज शेअर केल्या. एका स्टोरीती वर्कआऊट करताना दिसत होती. तर दुसऱ्या स्टोरीत तीने ड्रायव्हिंगग स्कूलचं साईनबोर्ड टाकलं असून त्यावर ‘आता कोणीतरी रस्त्यावर उतरणार आहे’ असं लिहिलं आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. हार्दिक पांड्या रस्त्यावर येणार का? असा प्रश्न विचारला जात होता.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. लग्नाआधीच नताशा गरोदार राहिली. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव अगस्त्य असं आहे. नताशा स्टेनकोविक 32 वर्षांची असून व्यवसायाने ती मॉडेल आणि डान्सर आहे. तीन आपल्या मॉडलिंग कारकिर्दीची सुरुवात 2012 मध्ये केली. सुरुवातीला ती काही प्रसिद्ध ब्रँडसची मॉडेल होती. त्यानंतर तीने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. 2013 मध्ये नताशाने सत्याग्रह चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती बिग बॉस 8 मध्ये ही सहभागी झाली होती. नताशाने आतापर्यंत 14 चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय काही चित्रपटात तीने आयटम साँगही केलेत.

हेही वाचा :

अभिनेत्रीचा आधी अफेअरच्या चर्चांना नकार आता थेट किसिंगचा व्हिडीओ समोर

फडणवीस उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर ठाम; दिल्लीत आज मोदी-शाहांना भेटणार?

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार