निवडणुकीत असे कसे घडले? महायुतीचे नेते विचारात पडले

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोणताही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक राजकीय(leaders)पक्ष हा कधीच संपत नसतो. फार फार तर त्याची शक्ती कमी होईल. पण त्याच्या उपद्रव मूल्याचा फटका प्रस्थापित राजकीय पक्षांना बसू शकतो. भारतीय जनता पक्षाला हे माहीत नाही असे नाही पण तरीही “काँग्रेसमुक्त भारत”च्या घोषणा त्यांच्याकडून सुरू होत्या आता हाच काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात 13 प्लस एक अशा 14 जागा जिंकून क्रमांक एक वर आला आहे. आणि भाजपची अवस्था दयनीय झाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी(leaders) स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकार मधून मुक्त करा अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना केली आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्ण वेळ पक्षासाठी द्यावयाचा आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त केले जाण्याची सध्यातरी शक्यता दिसत नाही.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची, महायुतीची पीछेहाट का झाली? याची अनेक कारणे राजकीय विश्लेषकांनी शोधून काढली आहेत. पण ती मान्य करण्याची मानसिक तयारी महायुतीच्या नेत्यांची दिसत नाही. इंडिया आघाडीकडून तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कडून या देशाचे संविधान धोक्यात आहे, ते बदलले जाणार आहे हे इतक्या मोठ्या आवाजात आणि तेही सतत सांगितले गेले आणि त्याचा तितक्याच मोठ्या आवाजात भाजपला, महायुतीला प्रतिवाद करता आला नाही.

शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेसची शकले केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राजकिय ताकद कमी होईल आणि त्याचा फायदा आपणास होईल हा अंदाज खोटा ठरला. उलट दोन पक्ष फोडल्याचा, तसेच आर्थिक घोटाळेबाज नेत्यांना सत्तेत आणून बसवले याचा राग महाराष्ट्रातील मतदारांनी मतदान यंत्राच्या माध्यमातून व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार या दोघांना मतदारांच्या कडून बऱ्यापैकी सहानुभूती मिळाली. याचा एकत्रित परिणाम म्हणजे महाविकास आघाडीला मिळालेले यश होय. भारतीय जनता पक्षाचा क्रमांक एकचा शत्रू म्हणजे काँग्रेस पक्ष. आणि हाच पक्ष आता महाराष्ट्रात भाजपा पेक्षा मोठा झाला आहे.

महायुतीची इतकी वाताहत का झाली याची कारणे फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांच्याकडून शोधली जात आहेत. कोणत्या जागी कोण विजयी होऊ शकतो याचे एका संस्थेकडून सर्वेक्षण अहवाल घेण्यात आला होता. आणि त्यावर विश्वास ठेवून जागांची अदलाबदल करण्यात आली होती. हे सर्वेक्षण चुकीचे होते म्हणून पराभव झाला असे निष्कर्ष त्यांनी काढले आहेत. पण प्रत्येक मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे घटक पक्षांची मते संबंधित उमेदवाराकडे परावर्तित झाली नाहीत.

उदाहरणार्थ बारामती मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेनेची मते सुनेत्रा पवार यांच्या खात्यावर जमा झाली नाहीत. त्यामुळे आता पराभवाचे खापर परस्परांवर फोडले जाईल. महायुतीत त्यामुळे बेबनाव तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि पराभूताच्या भूमिकेतून महायुतीच्या नेत्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही तर विधानसभा निवडणुकीत यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नाही.

महाराष्ट्रात महायुतीचा विशेषता भारतीय(leaders) जनता पक्षाचा जो पराभव झाला त्याबद्दल शिवसेनेला आनंद होणे अपेक्षित होते. पण भारतीय जनता पक्षाचे देशपातळीवर संख्याबळ घटले याचाच अधिक आनंद त्यांना झाला आहे. कारण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ढोल वाजवून जल्लोष व्यक्त करावा इतके यश मिळाले आहे असे म्हणता येणार नाही. कारण ठाकरे गटाच्या शिवसेनेने 21 जागा लढवून नऊ जागांवर विजयी संपादित केला आहे. म्हणजे 40% इतकेच यश त्यांना मिळाले आहे. आणि हे यश फार मोठे आहे असे नाही. त्यांचा पक्ष फोडणाऱ्या भाजपाची मोठी तिचे हाट झाली याचाच त्यांना आनंद अधिक आहे आणि तो स्वाभाविक आहे. 12 जागांवर आपल्या उमेदवारांचा पराभव का झाला याचे आत्मचिंतनही आता उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांनी केले पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी आठ जागा जिंकल्या आहेत. म्हणजे त्यांना 80% यश मिळालेले आहे. त्यांनी अतिशय संयतपणे आनंद व्यक्त केला आहे. अर्थात त्याचे सर्व श्रेय शरद पवार यांनाच दिले पाहिजे. या लोकसभा निवडणुकीत एक मात्र गोष्ट नक्की झाली आणि ती म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मते ज्या त्या उमेदवाराकडे परावर्तित झाली म्हणून या आघाडीला यश मिळाले असे म्हणता येईल.

केंद्रात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत सध्या भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते गुंतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडून “महाराष्ट्रात असे कसे घडले?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न होईल.

हेही वाचा :

शरद पवारांच्या पक्षात ‘इनकमिंग’? जयंत पाटील म्हणतात…

तरुणांमध्ये मायग्रेनचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

CRPF जवनांच्या वाहनांना ट्रकच्या अपघातात एका जवानाचा मृत्यू..