शौचास बसण्याच्या कारणावरून वाद टोकाला गेला…

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कायक घटना समोर(reason daw) आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शौचास बसण्याच्या कारणावरून एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये शौचास बसण्याच्या कारणावरून तिघांनी एकावर(reason daw) जीवघेणा हल्ला केला. इथे बसू नको असं म्हटल्यानंतर राग अनावर होताच तिघांनी ६० वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोळघर गावात ही घटना घडली आहे.

इथे बसू नको, म्हटल्यावर तिघांनी ६० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गंभीर हल्ला केला. शौचास बसण्याच्या कारणावरून झालेल्या हल्ल्यात साठ वर्षीय कैलास साठे गंभीर जखमी झाले आहेत.जीवघेणा हल्ला प्रकरणी तिघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील केसर सिंग पुरा भागात काही गुंडांनी एका कुटुंबीयाला घराच्या मालकी हक्काच्या वादावरून बेदम मारहाण केली. घरातील वस्तू, साहित्य बाहेर काढताना विरोध केल्याने या गुंडांनी कुटुंबीयांतील सदस्यांना मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात अज्ञात 10 ते 12 गुंडाविरुद्ध नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिकचा तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा :

कांद्याला झळाळी! दरात झाली वाढ, कोणत्या बाजारात किती दर?

टाटा तिथे नो घाटा! शेअरने पकडला रॉकेट स्पीड, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

पंकजा मुंडेंबद्दल वादग्रस्त पोस्ट; मोर्चा, बंद अन् धडा शिकवण्याचा इशारा…