घटस्फोटीत पत्नीसोबत लग्न करणाऱ्या तरुणाला कोयत्याने वार करून संपवलं

पुणे : घटस्फोटीत पत्नीने दुसरे लग्न केल्याच्या रागातून पहिल्या पतीने महिलेच्या(death) दुसऱ्या पतीवर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजता कसबा पेठेतील पवळे चौक परिसरात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी रात्री दोघांना अटक केली आहे.

सुमीत पटेकर (वय ३४, रा.पवळे चौक, कसबा पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे(death) नाव आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनी राजेंद्र मारटकर ( वय ३६, रा.गवळी वाडा, खडकी बाजार), शिवम गणेश मुनियार (वय २८, रा. पंकज कॉलनी, खडकी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाल्या आहेत.

फिर्यादी महिलेचा सनी मारटकर याच्यासमवेत विवाह झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र कौटुंबिक वादातून त्यांच्यात घटस्फोट झाला होता. त्यानंतर फिर्यादी महिलेने सुमीत पटेकर याच्याशी विवाह केला होता. त्याचा राग सनी मारटकर याच्या डोक्‍यात होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी अडीच वाजता फिर्यादी, तिचा पती सुमीत व त्याची आई असे तिघेजण त्यांच्या घरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सनी व शिवम त्यांच्या घरात आले. त्यांनी सुमीतवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली.

फिर्यादीने सुमीतची सुटका करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी संशयित आरोपींनी तिच्यावरही कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने सुमीतचा जागीच मृत्यू झाला. तर फिर्यादी या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त रंगनाथ उंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री साडे आठ वाजता पोलिसांनी या घटनेतील दोघांना तत्काळ अटक केली.

संशयित आरोपी सनी मारटकर याचे वडील राजा मारटकर हा सराईत गुन्हेगार होते. त्यांची खडकी बाजारात मोठी दहशत होती. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले होते. टोळी युद्धातून तंबी गोस आणि त्याच्या साथीदारांनी राजा मारटकर याचा खून केला होता.

हेही वाचा :

शरद पवार गटातून मोठी बातमी! अजितदादांच्या आमदारांना दिली डेडलाईन

दादा केंद्रीय मंत्री होणार : केंद्रात कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्यांदा स्थान मिळणार ?

सरकार स्थापनेपूर्वीच NDA चं टेन्शन वाढलं; चंद्राबाबू नायडूंनी केली ‘ही’ मोठी मागणी