दिल्लीत मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक; फडणवीस आजच देणार राजीनामा?

नवी दिल्ली: दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तातडीने(emergency) बैठक होत आहे. राज्याचे तिन्ही ज्येष्ठ नेत्यांची प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झालीय. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या राजीमाना देण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील (emergency)अनेक विषय, मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीचा उद्देश हा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या राजीनाम्या संदर्भातील आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र भेटत आहेत त्यामुळं त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीतही त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा :

घटस्फोटीत पत्नीसोबत लग्न करणाऱ्या तरुणाला कोयत्याने वार करून संपवलं

बॉलिवूडला खडेबोल सुनावत कंगना रणौतकडून ‘इमर्जन्सी’चा प्रचार

सरकार स्थापनेपूर्वीच NDA चं टेन्शन वाढलं; चंद्राबाबू नायडूंनी केली ‘ही’ मोठी मागणी