मुंबई : गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं(screen) नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच १४ जुन २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी अंगावर शहारे आणणारा याच चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीझ झालाय. त्यामुळे गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे.
या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका(screen) अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारली आहे. इतकच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय.
सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत.
मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार आहे.
खऱ्या आयुष्यात मराठ्यांचा साथ मिळवल्या नंतर आता आरक्षणाच्या चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील ह्यांना मोठ्या पडद्यावर सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल ह्यात काही शंका नाही. ”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
हेही वाचा :
“हवा” च नव्हती, तर मग….., शेट्टींची शिट्टी कशी वाजणार?
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना रद्द होण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण!
सांगलीत बांधकाम कामगारावर जीवघेणा हल्ला, कोयत्याने डोक्यात वार