जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आता अजिबात टेन्शन नाहीये. भरती प्रक्रियेला (distillation) सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरू असून भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून ही भरती सुरू आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. 40 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. aiesl.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावा लागेल. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर मग झटपट अर्ज करा, मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 29 जून 2024 च्या अगोदर अर्ज ही करावी लागतील. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. सीनियर एग्जीक्यूटिव, एग्जीक्यूटिव आणि ऑफिसर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. पदानुसार शिक्षणाची अट असेल.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/B.Tech/MBA किंवा PGDM पदवी असणे आवश्यक आहे. हेच नाही तर उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणेही आवश्यक आहे. 47 हजार 625 रुपये ते 1 लाख 24 हजार 670 रुपयांपर्यंत पगार हा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फीस ही भरावी लागेल.
1500 रूपये फीस उमेदवारांना भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवारांनी व्यवस्थित वाचून घ्यावे आणि मगच अर्ज करावीत.
हेही वाचा :
पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावर कोसळली दरड
रोहित शर्मा खेळला नाही तर कोण करणार टीम इंडियाच नेतृत्व?
‘आरक्षण दिलं नाही तर, एकही आमदार निवडून येणार नाही’; फडणवीसांच्या विधानानंतर जरांगेंचा इशारा