घटस्फोटाची चर्चा असतानाच नताशा मुलासोबत स्पॉट, हार्दिक पांड्या याच्या..

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे(divorce) तूफान चर्चेत आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्यामधील वाद टोकाला गेल्याचे मध्यंतरी सांगितले जात होते. हेच नाही तर नताशा हिने सोशल मीडियावरून पांड्या हे नाव देखील काढून टाकले. प्रत्येक सामन्यादरम्यान नताशा ही हार्दिक पांड्या याचा सपोर्ट करण्यासाठी मैदानावर पोहचते. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये पतीला सपोर्ट करण्यासाठी नताशा पोहचली नव्हती. घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच नताशा ही एका विदेशी मित्रासोबत मुंबईमध्ये स्पॉट झाली. ज्यानंतर अनेक चर्चा रंगताना दिसल्या.

घटस्फोटाची सतत चर्चा असतानाच नताशा हिने घटस्फोटाबद्दल(divorce) भाष्य करणे टाळले. हार्दिक पांड्या आणि नताशा यांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोटाची चर्चा असतानाच आता नताशा ही मुंबईमध्ये स्पॉट झालीये. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत मुलगा अगस्त्य हा दिसला. आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

नताशा ही मुंबईतील एका सलूनमध्ये मुलासोबत पोहचली. यावेळी अगस्त्य हा काचेमधून पापाराझींकडे पाहताना दिसला. नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी 2020 मध्ये लग्न केले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये यांनी परत एकदा लग्न केले. अत्यंत शादी पद्धतीने यांचा विवाहसोहळा पार पडला.

घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच नताशा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये नताशा हिने थेट म्हटले होते की, एक व्यक्ती लवकरच रस्त्यावर येणार आहे. यानंतर नताशा ही हार्दिक पांड्या यांच्याबद्दलच बोलत असल्याचा अंदाजा अनेकांनी लावला. नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच हार्दिक पांड्या याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या याने स्पष्ट म्हटले होते की, माझ्या नावावर काहीच संपत्ती नाहीये. माझ्या संपत्तीमध्ये माझी आई पार्टनर आहे. हेच नाही तर घर आणि सर्व गाड्या माझ्या वडिलांच्या आणि भावाच्या नावावर आहेत. हार्दिक पांड्या हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

हेही वाचा :

कोथिंबीर २००, मिरची १२० रुपये किलो; आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले

भयंकर! कारच्या धडकेत गरोदर महिला हवेत फुटबॉलसारखी उडाली Video

व्हॉट्सॲपने आणलंय हे भन्नाट फिचर; मोबाईल सुरु न करताच कुठूनही अपडेट करा स्टेटस