टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या टी 20 वर्ल्ड कप (icc t 20 wc) 2024 स्पर्धेतील 19 व्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. ए ग्रुपमधील हे दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे सुरुवात होणार आहे.त्याआधी साडे सात वाजता टॉस होणार आहे. या सामन्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. क्रिकेट चाहते स्टेडियमच्या दिशेने पोहचत आहेत. तसेच स्थानिकांनीही स्टेडियम बाहेर एकच गर्दी केली आहे.
टीम इंडिया बाबर आझम विरुद्धच्या संघाविरुद्ध 2 हात करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला महारेकॉर्ड करण्याची सुवर्णसंधी आहे. रोहितला श्रीलंकेचा माजी दिग्गज कर्णधार-फलंदाज महेला जयवर्धने याचा टी 20 वर्ल्ड कप इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाच्या धावांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. रोहितला हा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. तर विक्रम बरोबरीत करण्यासाठी केवळ 1 धाव हवी आहे. तर टी 20 वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम हा टीम इंडियाचा रनमशीन अशी ओळख असलेल्या विराट कोहली याच्या नावावर आहे.
टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावांचा विक्रम
विराट कोहली याच्या नावावर 2012 पासून 28 सामन्यांमधील 26 डावांमध्ये 1 हजार 142 धावांची नोंद आहे. तर दुसऱ्या स्थानी महेला जयवर्धने आहे. जयवर्धनने 2007 ते 2014 या दरम्यान 31 सामन्यांमध्ये 1 हजार 16 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी रोहित आहे. रोहितनेही पहिल्या अर्थात 2007 पासून 40 सामन्यांमधील 37 डावांमध्ये 1 हजार 15 धावा केल्या आहेत. आता रोहितने पाकिस्तान विरुद्ध दुसरी धाव घेताच महेला जयवर्धनेचा रेकॉर्ड ब्रेक करेल.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आझम (कॅप्टन), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.
हेही वाचा :
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठाम
घटस्फोटाची चर्चा असतानाच नताशा मुलासोबत स्पॉट, हार्दिक पांड्या याच्या..
कोथिंबीर २००, मिरची १२० रुपये किलो; आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले