गुगलने ऑनलाइन पेमेंट गुगल पे अॅप आजपासून बंद केलं आहे. तसेच गुगल पे(gpay) अॅप प्लेस्टोअरवरून देखील हटवण्यात आलं आहे. GPay आजपासून यूएसमध्ये बंद झालं आहे. यूएसमध्ये P2P पेमेंट डिस्कंटीन्यू झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
४ जूनपासून सर्विस बंद
अमेरिकामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे गुगल पे(gpay) अॅप ४ जून पासूनच बंद झाले आहे. अॅप बंद झाल्यानंतर येथील व्यक्तींनी हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर शोधले. मात्र त्यांना तेथेही हे अॅप दिसले नाही.
गुगलने हा निर्णय नेमका का घेतला?
गुगलकडून यूजर्ससाठी आणखी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. गुगल विविध योजनांवर काम करत आहे. गुगल यूजर्सनां गूगल वॉलेट आणि मोबाइल पेमेंट सर्विस देखील पुरवत आहे. त्यामुळे यूजर्सने याचाही वापर केला पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतातही लॉन्च झालं गुगल वॉलेट अॅप
भारतात देखील गुगल वॉलेट अॅप गेल्या काही दिवसांपूर्वीच लॉन्च करण्यात आलं आहे. हे अॅप गुगल पे पेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने चालतं. भारतात अद्याप याचा वापर करण्यास सुरुवात झालेली नाही. गुगल वॉलेट काही ठरावीक कामांसाठी आहे. याच्या सहाय्याने फोनमध्ये काही इवेंट आणि तिकिट बुकींगची कामे केली जाऊ शकतात.
हेही वाचा :
इचलकरंजीत आजपासून टेम्पो चालकांचे काम बंद!
कालच शपथविधी, आज मंत्रिपद सोडण्याची इच्छा; भाजप खासदाराने सांगितली अनेक कारणं
मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यातही पोहोचला बिबट्या? राष्ट्रपती भवनातील व्हिडीओ व्हायरल