आत्मा हा कायम राहत असतो, भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा मोदींना इशारा

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार(political) यांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून शरद पवारांनी मोदींना प्रतिटोला लगावत, ही भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा(political) 25 वर्धापन दिन होता. दोन्ही गटांनी हा वर्धापन दिन सोहळा साजरा केला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा रौप्य महोत्सवी मेळावा अहमदनगर येथील न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी झाला. महोत्सवाच्यानिमित्तानं राष्ट्रवादी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. विविध वक्त्यांनी विधानसभेला 85 आमदार निवडून आणण्याचा सूर अवळण्यात आला.

“निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व मर्यादा पाळल्या नाहीत. आम्ही राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतो, पण मर्यादा पाळतो. त्यांनी माझा भटकता आत्मा म्हणून उल्लेख केला. एका दृष्टीन बर झाले, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही,” असा इशारा शरद पवारांनी मोदींना दिला आहे.

“शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली. शिवसेनेनं मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढवला. मोदींनी नकली शिवसेना असा उल्लेख केला. हे त्यांना शोभते का? मोदींना तारतम्य राहिले नाही. सत्ता जाणार हे दिसले की माणूस अस्वस्थ कसा होतो, हे यातून दिसले आहे,” अशा शब्दांत पवारांनी मोदींना फटकारलं आहे.

“आपण नव्या विचारांनी जाऊया. समाजातील सर्व घटकांसाठी आणि त्यांच्या हितासाठी काम करूया. निवडणुका येतील, आपण निवडणुकांना सामोरे जाऊया. लोकांना मनापासून सेवा करण्याचे वचन देऊया,” असं शरद पवारांनी म्हटलं.

हेही वाचा :

इचलकरंजीत आजपासून टेम्पो चालकांचे काम बंद!

कालच शपथविधी, आज मंत्रिपद सोडण्याची इच्छा; भाजप खासदाराने सांगितली अनेक कारणं

मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यातही पोहोचला बिबट्या? राष्ट्रपती भवनातील व्हिडीओ व्हायरल