‘शिखांनी तुमच्या आया-बहिणींना वाचवलंय…’ पाकिस्तान खेळाडूच्या ‘त्या’ जोकवर हरभजनचा फिरला दांडपट्टा

भारत आणि पाकिस्तान(lashed) या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामना होतो तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप(lashed) 2024 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्याची चर्चा सुरू असताना पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने अर्शदीप सिंगसह शीख समुदायाची खिल्ली उडवली, त्यानंतर हरभजन सिंग त्याच्यावर चांगलाच संतापला.

खरंतर भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. त्यावेळी अर्शदीप सिंगने गोलंदाजीची जबाबदारी घेतली. अर्शदीप गोलंदाजी करत असताना कामरान अकमल पाकिस्तानच्या एका न्यूजमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा करत होता. यावेळी त्याने अर्शदीप सिंग आणि शीख समुदायाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली.

व्हिडिओमध्ये तो म्हणताना दिसत आहे. बघा, अर्शदीप सिंगला शेवटची ओव्हर करायची आहे. काहीही होऊ शकते कारण… बारा वाजले आहेत. यानंतर तो जोरजोरात हसताना दिसत आहे. तो तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांसोबत हसतो.

https://twitter.com/i/status/1800127739896496469

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने कामरान अकमलच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. यावर हरभजन सिंगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले, ‘धन्यवाद कामरान अकमल. घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घ्या. आम्ही शीखांनी तुमच्या माता-भगिनींना वाचवले, जेव्हा आक्रमणकर्त्यांनी त्यांचे अपहरण केले होते, वेळी 12 वाजलेली होती. लाज वाटली.. थोडी कृतज्ञता बाळगा. अमेरिकेकडून खेळणाऱ्या जसकरण मल्होत्रानेही कामरान अकमलला फटकारले आहे.

हेही वाचा :

टीम इंडियाच्या पाकिस्तानवरील विजयानंतर BCCI सचिवांचा स्टँडमध्ये जल्लोष, Video Viral

उर्वशी रौतेलानं पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा एकदा चर्चेत

आत्मा हा कायम राहत असतो, भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा मोदींना इशारा