सांगली : कोल्हापुरातील तरुणाचा सांगलीत निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक(hospital) घटना घडली. काल (10 जून) रोजी ही घटना घडली. डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. खून झालेला 28 वर्षीय तरुण असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.
सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये(hospital) काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली शहरातील राजूनगर मंगळवार बाजार जवळील मज्जित समोर एका युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयुरेश यशवंत चव्हाण (वय, 30 रा. भेंडवडे. ता. हातकणंगले.जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये केअर टेकरचे काम करत होता. काल रात्री आपल्या हॉस्पिटलचे कामावरून तो आठ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडला अशी माहिती त्याच्या सहकार्याने दिली. त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या हत्येने शहरात खळबळ उडाली असून आरोपीला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा , संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली. या हत्येचा अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :
कांदा शेतकऱ्यांना हसवणार, ग्राहकांना रडवणार; ईदपूर्वी दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ!
“शरीरावर प्रेम करणं हा…”; वजनामुळे ट्रोल होणाऱ्या महिलांना सोनालीनं दिला खास संदेश
‘शिखांनी तुमच्या आया-बहिणींना वाचवलंय…’ पाकिस्तान खेळाडूच्या ‘त्या’ जोकवर हरभजनचा फिरला दांडपट्टा