ड्रेनेज, पावसाळी (rain) लाईनसह रस्त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा रस्ते खोदाई नको आहे. शहर व उपनगर मान्सूनपूर्व पावसाने रस्त्यांना आलेले ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले असून पावसाळीपूर्व ११ कोटीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत पालिका प्रशासनाच्या कारभारावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी ताशेरे ओढले.
‘कात्रज ते नवले पूल बाह्यवळण महामार्ग व वंडरसिटी ते माऊली नगर उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार असून गडकरी साहेबांनी निधी दिला असल्याने काम सुरू आहे.
मात्र त्याला गती देणे गरजेचे असल्याचे सुळे म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, अमृता बाबर, नमेश बाबर, दीपक गुजर, अनिल कोंढरे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
…तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू
पुणे शहरात सातत्याने क्राईम, ड्रग्ज प्रकार वाढत आहेत. तसेच, मूलभूत सुविधा व विकास कामात पालिका प्रशासन कमी पडत आहे. यावरून
पुण्यात पालिका व पोलीस प्रशासन नक्की आहे की नाही समजत नाही. या विरोधात लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला
हेही वाचा :
जिल्हाधिकाऱ्यांची तालुकानिहाय विशेष मोहिम!
उल्हासनगरमध्ये भरधाव ट्रकचा वृद्धाला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद
Icc T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 साठी पहिली टीम फिक्स