ग्रामस्थ आणि डॉक्टरांच्या पथकांनी विनंती केल्यानंतर त्यांनी उपचार घेतले. (trusted)त्यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतही उपस्थित होते. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती केली.मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पहाटे अडीच वाजता उपचार घेतले.
मंगळवारी ते उपचार न घेण्यावर ठाम होते, पण प्रकृती खालावल्यानंतर ग्रामस्थ आणि डॉक्टरांच्या पथकांनी विनंती केल्यानंतर त्यांनी उपचार घेतले. त्यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतही उपस्थित होते. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती केली. आमदार राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मंगळवारी रात्री काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. दरम्यान, मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत येणार आहे. यामध्ये कोण कोण आहे? याची माहिती अद्याप समोर आलेले नाही.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे(trusted) विश्वासू मानले जातात. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, त्याच दिवशी राऊत त्यांच्या भेटीला आले होते. त्यावेळीही त्यांनी जरांगेंशी चर्चा केली होती. पण काही तोडगा निघाला नव्हता. आता पुन्हा उपोषणाच्या पाचव्या दिवशी राजेंद्र राऊत जरांगेंच्या भेटीला आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीमध्ये रात्री साडेअकरा वाजता आले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर येथील संपूर्ण घटनाक्रम आणि माहिती फडणवीस यांना फोनद्वारे दिली.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. त्यांच्या प्रकृतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना आमदार राऊत यांनी माहिती दिली. राजेंद्र राऊत यांना फडणवीसांचे जवळचे आमदार म्हटले जाते.(trusted) मनोज जरांगे यांनी रात्री अडीच वाजता जरांगे यांनी उपचार घेतले.
उपोषणाच्या 5व्या दिवशी पहाटे अडीच वाजता वाजता आज मनोज जरांगे यांनी उपचार घेतले. रात्री बर्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची देखील विनंती केली. यावेळी ग्रामस्थ आणि डॉक्टरांच्या पथकाने विनंती केल्यावर मनोज जरांगे यांनी सलाईन लावण्यास परवानगी दिली.
हेही वाचा :
इचलकरंजीत ऐन पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई
पुढील 15 तास हवामान विभागाकडून हायअलर्ट
ठाकरे गटात ठिणगी, शिवसेनेच्या बड्या नेत्याविरोधात दंड थोपटले