साऊथचे पाच चित्रपट छप्परफाड कमाई करण्यास सज्ज

कमाईच्या बाबतीत साऊथचे चित्रपट बॉलिवूडपटांना टक्कर देतात. (new south movie)येत्या काही दिवसांत पाच साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार आहेत.सिनेप्रेमींमध्ये सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची चांगलीच क्रेझ आहे.’बाहुबली’,’केजीएफ’,’पुष्पा’,’आरआरआर’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून साऊथ इंडस्ट्री खूपच लोकप्रिय झाली आहे. चाहते आता दाक्षिणात्य चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.

कमाईच्या बाबतीतही दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडपटांना टक्कर देतात. येत्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. या आगामी साऊथ चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. साऊथचे पाच चित्रपट छप्परफाड कमाई करण्यास सज्ज आहेत. रिलीज होताच हे चित्रपट 1000 कोटींचा गल्ला जमवू शकतात. 

1. ‘पुष्पा 2’ : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने हिंदी पट्टीत चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी ‘पुष्पा 2’बद्दल घोषणा केली आहे. (new south movie)अल्लू अर्जुनसह या चित्रपटात रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या स्ट्रीमिंगबाबत नेटफ्लिक्ससोबत बोलणी झाली आहेत. 250 कोटी रुपयांत या चित्रपटाचं डील झालं आहे.

2. कल्कि 2898 एडी : ‘बाहुबली’ फेम प्रभास अभिनीत ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाची 600 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. 375 कोटी रुपयांत या चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकले गेले आहेत. तेलुगू, तामिळसह विविध भाषांमध्ये हा पॅन इंडिया चित्रपट रिलीज होणार आहे. 

3. देवारा : ज्युनिअर एनटीआरचा बहुचर्चित ‘देवारा’ हा चित्रपट याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. ‘देवारा’ या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरसह सैफ अली खान आणि जान्हवी कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.(new south movie) नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे 155 कोटी रुपयांत ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत.

4. गेम चेंजर  : ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या राम चरणचा ‘गेम चेंजर’ हा चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात राम चरणसोबत कियारा आडवाणीदेखील दिसणार आहे. कोट्यवधी रुपयांत या चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत. 

5. ओजी : दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण ‘ओजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून धमाका करण्यास सज्ज आहे. सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सने 92 कोटी रुपयांत या चित्रपटाच्या स्ट्रीमिंगचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. 

हेही वाचा :

इचलकरंजीत ऐन पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई

पुढील 15 तास हवामान विभागाकडून हायअलर्ट

ठाकरे गटात ठिणगी, शिवसेनेच्या बड्या नेत्याविरोधात दंड थोपटले