शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मिशन विधानसभा

सातारा लोकसभेचा पराभव जिव्हारी लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (preparations)शरदचंद्र पवार पक्षाने आता गाफील न राहता विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. सातारा लोकसभेचा पराभव जिव्हारी लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता गाफील न राहता विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी या पक्षाने केली आहे. त्यासाठी येत्या जुलै महिन्यात खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत बैठकीत याबाबतची रणनिती ठरणार आहे.वाई, पाटण येथून राष्ट्रवादीने मताधिक्य घेतले होते, त्या ठिकाणचा आगामी आमदार हा शरद पवार यांच्या पक्षाचाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून जरी भाजपचा खासदार निवडून आला असला तरी येथील शरद पवारांच्या पक्षाची ताकत कमी झालेली नसल्याचे चित्र आहे. तर कराड उत्तर, वाई आणि पाटणमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराला लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेले वाढीव मताधिक्य पाहता, या(preparations) मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत हा पक्ष उमेदवार देणार आहे.

यापैकी कराड उत्तर मतदारसंघात त्यांचेच आमदार बाळासाहेब पाटील हे आहेत. पण, पाटण आणि वाईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला गेल्यास पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार मकरंद पाटील यांना झगडावे लागणार आहे. मकरंद पाटील हे सध्या महायुतीत असून त्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक मते शशिकांत शिंदेंना मिळाली आहेत.

त्यामुळे आगामी काळात धोका पत्करण्यापेक्षा मकरंद पाटलांकडून वेगळा विचार केला जाऊ शकतो. तसे त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही आधीपासूनच तुतारी हातात घ्या, असे आवाहन होतच आहे. पण, अजित पवारांना सोडणेही मकरंद पाटलांना त्रासदायक ठरु शकते. कारण दोन कारखाने व भाऊ नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याबाबतचा शब्द याबाबी ही महत्वपूर्ण आहेत. पण, त्यांच्याकडून(preparations) शब्द पाळला गेला नसल्याने भाजप त्यांना कितपत साथ देणार हेही महत्वाचे आहे.

दुसरीकडे पाटण मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात शरद पवार यांचा पक्ष उमेदवार देणार हे निश्चित आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीत येथील शशिकांत शिंदेंना चांगले मताधिक्य मिळाले आहे. शंभूराज देसाईंचा शब्द मतदारांनी पाळला नाही. त्यामुळे पाटणमधून राष्ट्रवादीकडून सत्यजित पाटणकरांना उतरविले जाणार की नवीन चेहरा दिला जाणार याची उत्सुकता आहे.

सध्यातरी लोकसभेचा पराभव पचवून शरद पवार यांची राष्ट्रवादी सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी त्यांनी कराड दक्षिण हा पृथ्वीराज चव्हाण यांचा मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे महायुतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची रणनीती विधानसभेला अडविणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत ऐन पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई

पुढील 15 तास हवामान विभागाकडून हायअलर्ट

ठाकरे गटात ठिणगी, शिवसेनेच्या बड्या नेत्याविरोधात दंड थोपटले