बुधवारी अर्थात 12 जूनला इंट्राडे ट्रेडमध्ये निफ्टी 23,441चा नवीन उच्चांक गाठल्यानंतर(stock market) बंद झाला. सेन्सेक्स 77,079च्या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर 30 अंकांनी खाली राहिला. मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि त्यानंतर मंत्रालयाच्या खात्यांचे वाटप यांना या वाढीचे श्रेय विश्लेषकांनी दिले.
सेक्टरल इंडेक्समध्ये निफ्टी मीडिया(stock market) आणि निफ्टी पीएसयू बँक अव्वल राहिले. दोन्ही अनुक्रमे 2 टक्के आणि 1 टक्के वाढले. एकमेव सेक्टोरल इंडेक्स निफ्टी एफएमसीजी इंडेक्स 0.4 टक्क्यांनी घसरला. निफ्टीने गॅप-अप ओपनिंग दाखवल्यानंतर 23,441.95 चा आजपर्यंतचा उच्चांक गाठला. पण, अस्थिर सत्रानंतर, तो अखेरीस 23,322.95 या दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
निफ्टी 23,200 लेव्हलच्या खाली बंद झाला तर 23,100 आणि 23,000 च्या पातळीपर्यंत आणखी करेक्शन दिसू शकते असे चॉईस ब्रोकिंगचे मंदार भोजने म्हणाले. याउलट, जर इंडेक्स 23,450 पातळीच्या वर बंद झाला, तर तो 23,600 आणि त्यावरील नवीन सर्वकालीन उच्चांकावर जाऊ शकतो. बाजार 23,200 ते 23,450 च्या श्रेणीत साईडवेज आणि अस्थिर राहण्याची आशा आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
- अंबुजा सीमेंट (AMBUJACEM)
- जिओ फायनान्स (JIOFIN)
- बँक ऑफ बडोदा (BANKBARODA)
- एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)
- ट्रेंट (TRENT)
- एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)
- भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
- फेडरल बँक (FEDERALBNK)
- कमिन्स इंडिया (CUMMINSIND)
- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
हेही वाचा :
राहुल गांधींनी सांगितलं अयोध्येतील भाजपच्या पराभवाचं कारण
गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या घरी पोहचले पोलिस
रेशन कार्ड ला आधार लिंक करण्यासाठी तारखेत मुदतवाढ