गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची(breakup) जोरदार चर्चा आहे. अर्जुन आणि मलायका ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहे. आपल्यापेक्षा काही वर्षांनी लहान असलेल्या अर्जुनला डेट केल्यामुळे मलायकाला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र ट्रोलिंगला न जुमानता अर्जुन आणि मलायकाने त्यांचं रिलेशनशिप जगजाहीर केलं होतं.
आता या दोघांनी परस्पर संमतीने आपले मार्ग वेगळे केल्याचं कळतंय. ब्रेकअपच्या(breakup) चर्चांदरम्यान गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये ‘पोस्ट-वॉर’ सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. अर्जुन आणि मलायका त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सतत काही ना काही पोस्ट शेअर करून त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. आता पुन्हा एकदा या दोघांनी इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केल्या आहेत.
अर्जुनने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये बदलाविषयीची पोस्ट शेअर केली आहे. ‘बदल टाळता येत नाही. त्याच्याशी जुळवून घ्या आणि प्रवाहानुसार वाहत जा’, अशा आशयाची ही पोस्ट आहे. तर दुसरीकडे मलायकाने सकारात्मक संदेश देणारी पोस्ट शेअर केली आहे. ‘सुप्रभात, हार मानू नका. गोष्टी घडवून आणण्यासाठी मार्ग शोधा’, अशा अर्थाची पोस्ट तिने शेअर केली आहे. ब्रेकअपच्या चर्चांवर दोघांनीही अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांच्यातील हे पोस्ट-वॉर पाहून चाहत्यांनाही आता अनेक प्रश्न पडले आहेत.
याआधीही अर्जुन आणि मलायका यांनी विविध पोस्ट शेअर केले होते. एका पोस्टमध्ये मलायकाने लिहिलं होतं, ‘जेव्हा ते म्हणतात की तुम्ही हे करू शकत नाही, तेव्हा ते दोनदा करा आणि फोटो क्लिक करा.’ त्याचवेळी अर्जुनने त्याच्या स्टोरीमध्ये लिहिलं होतं, ‘आपल्याकडे आयुष्यात दोन पर्याय असतात. आपण आपल्या भूतकाळाचे कैदी होऊ शकतो किंवा भविष्यातील शक्यतांचा शोध घेणारे बनू शकतो.’
19 वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अर्जुनसोबतच्या नात्यामुळे मलायका अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. मलायका आणि अर्जुनने 2018 मध्ये त्यांच्या नात्याला जाहीरपणे कबुली दिली होती. मलायकाच्या 45 व्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अर्जुनने प्रेम व्यक्त केलं होतं.
हेही वाचा :
ग्राहकांना मोठा धक्का! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग
शेअर बाजारात जोरदार तेजीची शक्यता; अंबुजा सीमेंट-फेडरल बँकसह ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष