बीड लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक मोठी चुरशीची(politics) झाली आहे. या निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला असल्याच्या चर्चा सुरू आहेत, अशातच एक मोठी बातमी आता समोर आली आहे. बीडमध्ये शरद पवार पक्षाच्या खासदाराच्या बॅनरवर मनोज जरांगेंचा फोटो असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे, या बॅनरवर किंगमेकर म्हणून जरांगेंचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.
बीडमध्ये पक्षाच्या बॅनरवर मनोज जरांगे यांचा फोटो(politics) पाहायला मिळाल्याने चर्चांना उधाण आले आहे. मनोज जरांगे यांचा आणि त्यांच्या मराठा आंदोलनाचा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत फायदा झाल्याची चर्चा सुरू आहेत, अशातच आता बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर मनोज जरांगे पाटलांचा फोटो पाहायला मिळाला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा बॅनर लावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या बॅनरवर मनोज जरांगे यांचा मोठा फोटो असून त्या बाजूलाच ‘किंगमेकर’ म्हणून उल्लेख देखील करण्यात आला आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह या बॅनरवर आमदार संदीप क्षीरसागर यांचा देखील फोटो आहे. महत्त्वाचं म्हणजे हे बॅनर दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झुंजार धांडे यांनी लावलं आहे. आता या बॅनर आणि फ्लेक्समुळे बीडसह जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
बीडमध्ये लोकसभा निवडणूकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे बजरंग सोनवणे यांचा दणक्याच विजय झाला आहे. पंकजा मुंडे यांचा ६५७८ मतांनी पराभव झाला आहे. बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा जास्त फायदा महाविकास आघाडीला झाल्याचं बोललं जात आहे. आता बजरंग सोनवणे यांच्या बॅनरवर मनोज जरांगे यांचा फोटो दिसला आहे.
हेही वाचा :
मराठा आंदाेलकांचा रास्ता राेकाे, 3 तासांपासून वाहतुक खाेळबंली
ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन-मलायकामध्ये ‘पोस्ट वॉर’
“वहिनी का चिडल्या?”; भारतविरुद्ध पाक सामन्यादरम्यानचा अनुष्काचा व्हिडीओ Viral