पाकिस्तान क्रिकेट संघाची यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. (team)बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचे सुपर 8 मध्ये जाण्याचे वांदे झाले आहेत. पाकिस्तानचा संघ युएसएकडून आणि भारताकडून पराभूत झाला आहे. त्यांनी कॅनडाविरूद्ध सामना जिंकला असला तरी त्यांचे पुढच्या फेरीतील स्थान जर तरवर अवलंबून असणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान संघाच्या अडचणीत (team)अजून वाढ झाली आहे. पाकिस्तान संघाचा एक वकील चाहता खूपच नाराज झाला आहे. पाकिस्तानच्या गुजरानवाला भागातील या वकिलाने पाकिस्तान संघावर थेट देशद्रोहाखाली खटला चालवण्यात यावा यासाठी याचिका दाखल केली आहे.
यासंदर्भात पाकिस्तानातील प्रसिद्ध न्यूज चॅनल समा टीव्हीनेही वृत्त दिले. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्याने देशाच्या संघाने केलेल्या कामगिरीबाबत काळजी व्यक्त केली आहे. त्याने हा देशाच्या पैशाचा अपव्य असून त्यांनी देशाचा विश्वासघात केल्या आहे असा दावा करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्याने संघावर लाखो रूपये आणि देशाची अखंडता धोक्यात घातली आहे. संघातील खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाने देशाच्या सन्मानापेक्षा आर्थिक फायद्याला जास्त महत्व दिल्याचा आरोप केला आहे.
याचिकेत अमेरिका आणि भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळं देशातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं चौकशी होईपर्यंत पाकिस्तान संघावर बंदी घालावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोर्टाने देखील या याचिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांना या प्रकरणी 21 जूनपर्यंत तक्रार दाखल झाल्यासंदर्भातील रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे
हेही वाचा :
मुन्ना-बंटी वाद आता पुढच्या पिढीत, कृष्णराज महाडिक कोल्हापूर दक्षिण विधानसभा लढवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून २८ जूनपर्यंत बंदी आदेश लागू!