एक मोठी बातमी समोर आली आहे. आघाडीची कार उत्पादक कंपनी मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक (investment) करणार आहे. मर्सिडिझ बेंझ कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार, असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
मर्सिडिझ बेंझच्या गुंतवणुकीबाबत माहिती देताना उदय सामंत ट्वीट करत म्हणाले आहेत की, ”आज जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा झाली.”
सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीला मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर, पॉलिटिकल ऑपरेशन्स – एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्रीमती मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, प्रदेश ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्री. मार्टिन शुल्झ, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.
हेही वाचा :
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले “ नावं घेऊन तुमचे उमेदवार पाडणार”
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क माणसाचं कापलेलं बोट…
मुंबई-गोवा हायवे वर 10 वर्षात 6000 कोटी खर्च करुनही हायवेची अवस्था दयनीय