आज शेअर बाजारात संमिश्र संकेत; कोणते शेअर्स असतील चर्चेत?

गुरुवारी निफ्टी एक्स्पायरीच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी(stock market today) विक्रमी तेजीसह बंद झाले. इंट्राडेमध्ये सेन्सेक्स 77 हजार 145 अंकांवर पोहोचला, तर निफ्टीनेही इंट्राडेमध्ये 23 हजार 481 अंकांची विक्रमी पातळी गाठली. मिडकॅप निर्देशांकही नव्या शिखरावर बंद झाला आहे. रियल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल शेअर्समध्ये खरेदी झाली.

ऑटो आणि आयटी शेअर्समध्येही(stock market today) तेजी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 204 अंकांनी वधारला आणि 76,811 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 76 अंकांनी वाढून 23,399 वर बंद झाला. बँक निफ्टी 48 अंकांनी घसरून 49,847 वर बंद झाला. तर मिडकॅप 426 अंकांनी वाढून 54,652 वर बंद झाला.

निफ्टी इंडेक्समध्ये टाईम करेक्शन दिसत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. सध्याचा कल कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. निवडक शेअर्समध्येच ट्रेडिंग करणे उचित ठरेल असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी कृषी, साखर, केमिकल आणि काही डिफेंस स्टॉक्समधील लॉन्ग पोझिशन्सचा सल्ला त्यांनी दिला.

बँक निफ्टीचा चार्ट 49,800 वर सपोर्ट दिसत असल्याचे सूचित करतो असे चॉईस ब्रोकिंगचे रिसर्च एनालिस्ट देवेन मेहता म्हणाले. यानंतर, पुढील मोठा सपोर्ट 49,600 आणि 49,500 वर आहे. बँक निफ्टीमध्ये वाढ झाल्यास पहिला रझिस्टन्स 50,100 वर असेल. त्यानंतर पुढील रझिस्टन्स 50,300 आणि 50,500 वर असेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • चोला फायनान्स (CHOLAFIN)
  • सिमेंन्स (SIEMENS)
  • हिंदुस्थान एअरोनॅटीक्स लिमिटेड (HAL)
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
  • झोमॅटो (ZOMATO)
  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
  • व्होल्टास (VOLTAS)
  • एम फॅसिस (MPHASIS)
  • कोफोर्ज (COFORGE)
  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

हेही वाचा :

भाज्यांचे दर वाढल्याने सामान्यांना फुटला घाम; दर १०० पार

भाजप-शिंदे गटात वादाची पहिली ठिणगी; मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीची मागणी

इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बदलीला स्थगिती!