सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा भांडार. सोशल मीडियावर(talk) रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात. लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. लोक सोशल मीडियावर लग्नाचे, डान्सचे, गाण्याचे आणि प्रेमाचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात.
प्रेमासाठी लोक काहीही करु(talk) शकतात हे तर सर्वांना माहित आहे. प्रेमासाठी, गर्लफ्रेंडसोबत बोलण्यासाठी तरुण काहीह करतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तरुण गर्लफ्रेंडशी बोलण्यासाठी चक्क प्लॅटफॉर्मच्या शौचालयावर जाऊन बसला आहे. या मुलाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल फोटो हा दादर स्टेशनवरील असलेला दिसत आहे. दादर स्टेशनवरील एका शौचालयाच्या वर चढून तो फोनवर बोलताना दिसत आहे. एवढी मेहनत फक्त गर्लफ्रेंडशी बोलण्यासाठी करत असेल, असा अंदाज नेटकऱ्यांना लावला आहे. हा व्यक्ती फोनवर बोलत आहे. त्याचसोबत त्याने तिथे आपला स्मार्टफोन चार्जिंगलादेखील लावला आहे.
फोन चार्जिंगला लावून तो कॉलवर बोलताना दिसत आहे. हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे अशा गोष्टी करणे टाळावे. या फोटोवर एवढी काय इमरजन्सी असेल बरं, असं या फोटोवर लिहण्यात आलं आहे. या तरुणाचा मजेशीर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
marathi.viral या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केला आहे. तो त्याच्या सोना- बाबूशी बोलत असेल, सोना- बाबूशी बोलण्यासाठी जीवाला धोका, मुलीची भानगड अजून काय अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.
हेही वाचा :
रोजगाराच्या आघाडीवर शुभवार्ता; मर्सिडीज महाराष्ट्रात 3 हजारांची गुंतवणूक करणार
सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची बातमी पक्की, ‘या’ अभिनेत्रीला मिळाली निमंत्रण पत्रिका
मोठी बातमी! प्रॉपर्टीचे दर 15 टक्क्यांनी घटणार…. ‘हे’ असेल देशातील नवं व्यावसायिक केंद्र