लोकसभेची निवडणूक संपताच शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का(political consultant) बसलाय. माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी (ता. १४) हा प्रवेश सोहळा पार पडलाय. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंदडा यांचे स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जयप्रकाश मुंदडा हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून(political consultant) सलग ४ वेळा निवडून आले होते. ते माजी सहकार राज्यमंत्री देखील होते. त्यांची हिंगोलीत मोठी ताकद आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंदडा हे नाराज होते. आपल्याला पक्षात डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीतही पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझं ऐकून न घेतल्याचं मुंडदा म्हणाले. इतकंच नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) यांनी देखील आपल्याला विश्वासात घेतलं नाही. तसेच परस्पर उमेदवार जाहीर केला, अशी नाराजी मुंदडा यांनी बोलून दाखवली.
पक्षात कुणीही आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याने शेवटी कंटाळून मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असं मुंडदा यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जयप्रकाश मुंडदा यांनी पक्षात प्रवेश केल्याने हिंगोलीत शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. मुंदडा यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजू चापके आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :
कोट्यवधी कर्मचाऱ्यांना EPFO चा धक्का, ही महत्वाची सुविधा बंद
कोल्हापूरात १८ जूनला मोर्चा! तर २७ जूनला……
सांगलीच्या गणेश खिंडीत धोका, संकट येण्याआधी प्रशासनाला जाग येईल का?