कोल्हापूर : कोल्हापुरातून(Kolhapur) अपघाताबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसनं काल (शुक्रवार) रात्री तिघांना चिरडलं आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्डजवळ रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याचे काहींनी सांगितले. मुंबईहून कोल्हापूरला (Kolhapur)येणारी कोयना एक्स्प्रेस मार्केट यार्डपासून पुढे कोल्हापूर स्थानकाच्या दिशेने येत होती. याचवेळी विक्रमनगरकडून मार्केट यार्डच्या दिशेने या तिघीजणी रुळावरूनच चालत जात होत्या. याचवेळी भरधाव आलेल्या कोयना एक्स्प्रेसने तिघींनाही चिरडलं.
या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला, तर दुसरी महिला आणि लहान मुलगी दुसर्या बाजूला पडल्या. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने दोन महिलांचे चेहरे छिन्नविच्छिन्न झाले. तर, लहान मुलगीही जागीच ठार झाली. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी आणि शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अजय सिंदकर सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा :
“कमळ”आता जपून ठेवा तसा थोडा उशीरच झाला!
उर्फी जावेद आणि ओरी लग्नबंधनात अडकणार?
निवडणूक संपताच ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश