अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर मानसिक उपचार(treatment) करण्याची गरज आहे. सरकारने त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करावी, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केली आहे. केतकी चितळे यांच्याकडून वक्फ बोर्डाला देण्यात आलेल्या शासनाच्या निधीवरून जोरदार टीका करण्यात आली आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. आता राज्य सरकारने(treatment) ‘वक्फ बोर्डा’ला १० कोटींचा निधी जाहीर केला आहे. यावरून केतकीने सरकारवर टीका केली आहे. यावेळी राज्य सरकारमधील ३ प्रमुख नेत्यांना लक्ष्य करत केतकीने संताप व्यक्त केला होता. तिने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली होती. यावरून आता अजित पवार गट आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
याला प्रत्युत्तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केतकी चितळेंवर टीका करताना म्हटलंय की, केतकी चितळेकडून हिंदू मुस्लिम जातीभेद करून विष पेरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, त्याचबरोबर मानसकि आणि बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्यांच्यावर मानसिक उपचाराची गरज आहे.
राज्य सरकारने कितकी चितळे यांच्यावरील मानसिक उपचाराची जवाबदारी घ्यावी, अशी मागणी आता अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.
केतकी चितळे यांनी अल्पसंख्याक समाजाला डीवचण्याचा धंदा करू नये, तो त्यांना परवडणार नाही, असा इशारा देखील नायकवडी यांनी दिला आहे. केतकी चितळेने महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेवरून अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसनं तिघींना चिरडलं…
“कमळ”आता जपून ठेवा तसा थोडा उशीरच झाला!
निवडणूक संपताच ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश