टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये होणार मोठी उलथापालथ, कोहली कितव्या क्रमांकावर खेळणार?

टी २० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय (india) संघानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकून टीम इंडियानं सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. चौथा सामना आज, शनिवारी कॅनडाविरुद्ध होणार असून, भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आणि फलंदाजी क्रमामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यशस्वी जयस्वाल याला संधी मिळू शकते. त्यामुळे तो सलामीला उतरला तर, विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो.

रोहित-जयस्वाल सलामीला?

आतापर्यंतच्या तीन सामन्यांत रोहित शर्मासमवेत सलामीला विराट कोहली आला होता. पण ही जोडी फार काही कमाल दाखवू शकलेली नाही. कोहलीची बॅट तळपली नाही. सलामीला खेळताना विराट सपशेल अपयशी ठरला. आयर्लंडविरुद्ध १, पाकिस्तानविरुद्ध ४ धावा आणि अमेरिकाविरुद्ध शून्यावर बाद झाला.

त्यामुळे रोहित शर्मा फलंदाजी क्रमात बदल करू शकतो, असे बोलले जाते. यशस्वी जयस्वालला संधी मिळाल्यास तो सलामीला येऊ शकतो. तर विराट पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची शक्यता आहे.

जयस्वालला कुणाच्या जागेवर संधी?

आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला टी २० वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळालं खरं, पण आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळू शकली नाही. आता चौथ्या सामन्यात त्याला संधी मिळू शकते. रविंद्र जडेजाच्या जागी त्याला संधी दिली जाऊ शकते. जडेजाकडून अपेक्षित खेळ होऊ शकलेला नाही. गोलंदाज म्हणूनही रोहितनं त्याला अधिक संधी दिलेली नाही. अशात कॅनडाविरुद्ध जडेजाला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकणार नाही.

संभाव्य प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.

हेही वाचा :

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशी यांचा सिनेमा…

सांगली : कॉंग्रेसच्या एकजुटीत खडे टाकणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली

गिलने रोहित शर्माला केलं अनफॉलो? शिस्तभंग केल्याने वर्ल्डकप संघातून शुबमनला रिलीज…