नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे(good). अनेक दिवसांपासून शेतकरी PM-KISAN योजनेच्या १७व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत. यादरम्यान, ते देशभरातील ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा PM-KISAN योजनेचा १७वा हप्ता जारी करणार आहेत.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान(good) यांनी पत्रकारांशी बोलताना कृषी क्षेत्राप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. चौहान म्हणाले, “पंतप्रधान मोदींचे गेल्या दोन कार्यकाळात शेतीला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदीजींनी सर्वप्रथम पीएम-किसान योजनेचा १७वा हप्ता जाहीर केला आणि त्यांनी त्या संबंधित फाइलवर सही देखील केली.”
PM-KISAN हा २०१९ मध्ये सुरू केलेला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) उपक्रम आहे. या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. चौहान म्हणाले की, ”योजना सुरू केल्यापासून केंद्राने देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ३.०४ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे”.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे विविध मंत्री वाराणसीतील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, कृषी मंत्र्यांनी कृषी सखी योजनेवर देखी भाष्य केलं आहे. जो ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहकार्याने आहे. या योजनेचे उद्दिष्ट बचत गटातील ९० हजार महिलांना अर्ध-विस्तार कृषी कामगार म्हणून प्रशिक्षित करणे, शेतकरी समुदायाला मदत करणे आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवणे हे आहे.
आतापर्यंत, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश या १२ राज्यांमध्ये लक्ष्यित ७० हजार पैकी ३४ हजारहून अधिक कृषी सखींना पॅरा-विस्तार कामगार म्हणून तैनात करण्यात आले आहे. सरकार कृषी क्षेत्रासाठी १०० दिवसांचा आराखडा तयार करत आहे, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या वचनबद्धतेवर सरकार भर देत आहे.
हेही वाचा :
काेल्हापूरच्या ग्रामदैवत कपीलेश्वर मंदिरासह कसबा बावड्यात चाेरट्यांचा धुमाकूळ
आज मेषसह ‘या’ 5 राशींना मिळणार अपार लाभ, होणार पैशांची भरभराट
पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू