देशामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार(hyper tension) स्थापन झालं आहे. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर संसदेचं पहिलं सत्र २४ जूनपासून सुरु होणार आहे. आठ दिवस अधिवेशन चालणार आहे.
संसदेच्या अधिवेशनाच्या(hyper tension) तिसऱ्या दिवशी २६ जून रोजी लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. या निवडीवरुन विरोधी पक्षाने रान उठवलं आहे. लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटकपक्षांना मिळालं पाहिजे, अशी भूमिका विरोधी नेते मांडत आहेत.
याच मुद्द्यावरुन नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाने भूमिका स्पष्ट केली असून भाजप जो काही निर्णय घेईल, त्याच्यासोबत आम्ही असू, असं म्हटलं. दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने अध्यक्षांची निवड ही सर्व घटकपक्षांच्या सहमतीने करावी, अशी भूमिका घेतली आहे.
टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभि राम कोमारेड्डी यांनी सर्वांची सहमती असलेल्या उमेदवाराची निवड लोकसभा अध्यक्ष पदासाठी करावी, अशी मागणी केली आहे. ”अध्यक्ष निवडीसाठी एनडीएचे सर्व सहकारी पक्ष एकत्र बसतील आणि ठरवतील. सर्वांनी निश्चित केल्यानंतरच उमेदवर दिला जाईल. त्यानंतर टीडीपीसह सर्व घटकपक्ष उमेदवाराचं समर्थन करतील” असं कोमारेड्डी म्हणाले.
हेही वाचा :
‘..तर तुमच्याविरुद्ध वॉरंट जारी करावं लागेल’; कोर्टाची भुजबळांना तंबी!
Good News! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जूनमध्ये खात्यात इतके पैसे जमा होणार
माधुरी दीक्षितसाठी स्वत:ला दिले सिगारेटचे चटके; अजय देवगणचा मोठा खुलासा