मनसेचे “राज”कारण कळण्या पलीकडचे…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना(comprehension) होऊन दिड तप उलटून गेले आहे. पक्ष संघटना वाढीसाठी हा कालावधी तसा पुरेसा आहे. तथापि अगदी सुरुवातीला सापडलेला सूर टिकवून ठेवण्यात राज ठाकरे यांना यश मिळालेले दिसत नाही.

आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळेच मनसेने 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका(comprehension) लढवलेल्या नाहीत. आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे ठाकरे यांचे”राज” कारण सर्वसामान्य माणसालाच नव्हे तर मनसेच्या कार्यकर्त्यांनाही कळण्यापलीकडचे झाले आहे.

महाबळेश्वर येथे झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्ष संघटनेची सूत्रे कार्यकारी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. स्थापनेनंतर पहिल्यांदाच लढवण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार विधानसभेवर निवडून गेले. मुंबई महापालिकेत सुद्धा मनसेचे काही नगरसेवक निवडून गेले होते. सत्तेच्या राजकारणातील पहिल्या दमदार एन्ट्री मध्ये चांगले यश मिळवलेल्या मनसेने महाराष्ट्रात सांगली राजकीय हवा निर्माण केली होती.

नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे गणित कुठे तरी चुकले. त्यांचा एकच उमेदवार विधानसभेवर निवडून गेला. मनसेने विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्या पण त्यांच्या मतांची टक्केवारी पाच वरून अवघ्या दोन टक्क्यावर येऊन पोहोचली. ही “राज”कीय घसरण का झाली याचे आत्म चिंतन राज ठाकरे यांच्याकडून झाले नाही ही वस्तुस्थिती आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत उतरावयाचे की नाही याचा निर्णयही थोड्या उशिराच घेतला. लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या सभांना होणारी गर्दी भाजपकडे परावर्तित करण्याचे ठरवले. राज ठाकरे आणि अमित शहा यांची दिल्लीत एक बैठक झाली.

त्यानंतर भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत त्यांची ही सभा झाली. त्यामध्ये त्यांनी माझा नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा असल्याचे घोषित करून टाकले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. या सभांचा भाजपला फायदा झाल्याचे दिसते. भाजप प्रणित एनडीए आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे साधे निमंत्रणही राज ठाकरे यांना देण्यात आलेले नव्हते. हे कसे काय घडले याचे समाधानकारक उत्तर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनाही देता आलेले नाही.

आता विधानसभा निवडणुकीत मनसे ही स्वबळावर उतरेल. मी कोणत्याही आघाडीकडे अर्थात महायुतीकडे आमच्या पक्षाला इतक्या जागा द्या अशी मागणी करण्यासाठी जाणार नाही. 200 पेक्षा अधिक जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुती बरोबर होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका ते महायुती मध्ये सहभागी होऊन लढवतील असे वातावरण निर्माण झाले होते. पण आता अचानक मी कोणाकडेही स्वतःहून जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यांची ही राजकीय भूमिका कळण्यापलीकडची असली तरी महायुतीला मात्र ती अडचणीची ठरणार आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर तिची राज्यभर बांधणी केलेली नाही. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर याच महानगरांमध्ये त्यांनी लक्ष दिले आणि संघटन वाढीसाठी प्रयत्न केले. नाशिक महापालिकेवर मनसेने एक हाती सत्ता काबीज केली होती. ही ठराविक महानगरे सोडली तर उर्वरित महाराष्ट्रात
अनेक महानगरे आहेत, तेथे त्यांनी लक्ष घातलेले नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात मनसेच्या शाखा असल्या तरी त्या संघटनदृष्ट्या कमकुवत आहेत. अशी एकूण राजकीय स्थिती असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर आपला उमेदवार देण्याचा घेतलेला निर्णय हा कळण्यापलीकडचा आहे.

हेही वाचा :

मोदी 3.0 सरकारचं पहिलं अर्थसंकल्प कधी होणार सादर? समोर आली मोठी अपडेट

गरोदर महिलांना सरकार देणार ६ हजार रुपये; कसं? जाणून घ्या

तिला भेटता आलं नाही म्हणून चाहत्याने दिलेला जीव, सोनाली बेंद्रेची भयानक Fan Moment वर प्रतिक्रिया