लोकसभा निवडणुकांच्या अगोदर झालेल्या ओबीसी मेळाव्यांना पंकजा मुंडे कधीही हजर राहिल्या नाहीत. धनंजय मुंडेदेखील ओबीसी मेळाव्यांना (gathering) अनुपस्थित असायचे. परंतु आता लोकसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी दाखल झाले. राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके हे ओबीसींच्या हक्कासाठी जालन्यातल्या वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले आहे. ओबीसींचं आरक्षण टिकावं आणि सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करु नये, या मागणीसाठी हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरु आहे.
वडीगोद्री येथील हाकेंच्या उपोषणस्थळी सोमवारी रात्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी पंकजा मुंडे यांनी भावना व्यक्त करताना सरकारने ओबीसींच्या हक्कांकडे लक्ष दिलं पाहिजे, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, अशी मागणी केली .
यावेळी धनंजय मुंडे यांचीदेखील उपस्थिती होती. विशेष म्हणजे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं दुसरं उपोषण धनंजय मुंडेंच्या मध्यस्थीने सुटलं होतं. आता मात्र मुंडेंनी त्यांनी ओबीसींच्या मंचावर जावून भूमिका घेतली आहे (gathering).
लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंची भूमिका बदलली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी भुजबळांना वेगळी भूमिका घेण्याची विनवणी केल्याची माहिती आहे.
हेही वाचा :
गौतम गंभीर प्रशिक्षक होताच चार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता?
19 जूनपासून सुरु होणार पोलीस भरती प्रक्रिया
निलेश लंकेंनी सांगितला चंद्रहार पाटलांना विजयाचा सूत्र; म्हणाले…