कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महायुतीच्या राजकीय रंगमंचावरचे(define character) एक अस्वस्थ पात्र म्हणजे छगन भुजबळ होत. ते कायम अस्वस्थ आणि महत्त्वकांक्षेच्या कक्षा सतत रुंदावतक ठेवणारे असल्याने कोणत्याही एका राजकीय पक्षात ते फार काळ रंगलेले नाहीत. अविभाज्य शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीचा अजितदादा गट असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत नाशिक मधून उमेदवारी हवी होती, पण ती त्यांना मिळाली नाही.
प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची(define character) जागा उर्वरित काळासाठी त्यांना हवी होती, पण तिथेही त्यांना नकार मिळाला. त्यांना लोकसभा किंवा राज्यसभेवर जाऊन केंद्रीय मंत्री पद हवे होते. त्यामुळे सध्या ते महायुतीमध्ये अस्वस्थ आहेत. शरद पवार यांनी अजितदादा गटातील कोणासाठीही दरवाजे उघडे ठेवलेले नाहीत. त्यामुळे त्यांची अस्वस्थता विधानसभा निवडणूक व निकालापर्यंत राहणार आहे.
छगन भुजबळ यांना अजितदादा यांच्याबरोबर महायुतीमध्ये ही जायचं नव्हतं. असं खुद्द छगन भुजबळ यांनीच माझ्याशी बोलताना सांगितलं होतं असं विजय वडेट्टीवारयांनी यांनी नुकतंच उघड केले आहे. आणि त्याचा खुलासा छगन भुजबळ यांनी केलेला नाही.अजितदादा गट फुटला तेव्हा राजभवनवर काय चाललय हे पाहून येतो असं शरद पवार यांना सांगून गेलेल्या छगन भुजबळांनी थेट मंत्रीपदाची शपथ घेतली. हा किस्सा शरद पवार यांनीच त्याच दिवशी सांगितला होता. खरंतर त्यांना भाजपच्या “वॉशिंग मशीन “ची तेव्हा भुरळ पडली होती. म्हणूनच ते तिकडे गेले. अशी टीकाही शरद पवार यांनी तेव्हा केली होती.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या प्रमाणावर अपयश का आले याचे खापर भुजबळ यांनी”अब की बार 400 पार” या घोषणेवर फोडले आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पराभवासाठी जबाबदार धरले आहे. ओबीसी समाजाने लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे पाठ फिरवली असेही भुजबळ यांचे मनाने आहे. ओबीसी समाजाला महायुतीकडे वळवण्यात भुजबळ कमी पडले. त्यांनी हे मुद्दाम केले असेल तर ओबीसी समाज हा त्यांच्या शब्दात राहिला नाही असा त्याचा अर्थ होतो.
समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपणच ओबीसी समाजाचे मुख्य नेते आहोत असे वातावरण तयार केले होते. प्रत्यक्षात ओबीसी समाज हा भुजबळ यांच्या पाठीमागे आहे असे चित्र दिसलेले नाही.ओबीसी समाजाच्या एकूण 13 संघटना आहेत. बबन तायवाडे, प्रकाश शेंडगे वगैरे नेते नेतृत्व करतात. आता ह्या दोन नेत्यांमध्ये लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणावरून वाद निर्माण झाले आहेत.
छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी पाहिजे होती. ती संधी गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या उर्वरित काळासाठी उमेदवारी हवी होती.दोन्ही ठिकाणी नकार घंटा मिळाल्यानंतर त्यांनी अगदी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. एकूणच महायुतीमध्ये आपणाला डावलले जात आहे असे भुजबळ यांना वाटते. म्हणूनच ते महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीमध्ये अस्वस्थ आहेत.
छगन भुजबळ यांच्या राजकारणाचा मागोवा घेतला तर असे दिसून येईल, ते कोणत्याही पक्षात फार काळ रमत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये मनोहर पंत जोशी, सुधीर जोशी या मामा भाच्यांना अधिक महत्त्व दिलं किंवा त्यांचे संघटने मधील महत्व बाळासाहेब ठाकरे यांनी अधोरेखित केल्यानंतर छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा बंड करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये ते अजित दादा यांच्याबरोबर मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
ते अतिशय महत्त्वकांक्षी राजकारणी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज हा माझ्यामागे आहे असे त्यांनी पद्धतशीरपणे वातावरण तयार केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मला महत्व दिले गेले नाही तर महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांना पश्चाताप करावा लागेल. असे ते गेल्या काही दिवसांपासून अप्रत्यक्षपणे सांगताना दिसत आहेत.
हेही वाचा :
कुरकुरीत आणि टेस्टी; नाश्त्याला बनवा टम्म फुगलेला मेदूवडा
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार; पेरणीच्या खर्चाचं टेन्शन मिटणार
गौतम गंभीर प्रशिक्षक होताच चार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता?