दोघात नको तिसरा, आता दादांना विसरा! भाजपमध्ये वाढतंय ‘त्या’ नेत्यांचं बळ

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला(leadership coaching). राज्यात ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलेल्या महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. यानंतर आता महायुतीमधील कुरबुरी समोर येऊ लागल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित फायदा झालाच नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. दादा गटाचे आमदार असलेल्या बऱ्याच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे महायुतीत तिसऱ्या पक्षाची गरज काय, असा दबाव आणण्यास भाजप नेत्यांनी सुरुवात केली आहे.

माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरुरमध्ये महायुतीला(leadership coaching) पराभव पाहावा लागला. या जागांवर अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बहुतेक ठिकाणी भाजप, शिंदेसेनेच्या उमेदवारांना फटका बसला. महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडले. मावळमध्ये शिंदेसेनेचे श्रीरंग बारणे जिंकले. पण दादा गटानं सहकार्य केलं नसल्याची तक्रार त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेनेतील काही नेत्यांनी अजित पवारांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आपापल्या नेतृत्त्वाकडे केली आहे.

अजित पवार गटाच्या आमदारांची मतं भाजप, शिंदेसेनेकडे वळली नसल्याचा तर्क आकडेवारीच्या आधारे दिला जात आहे. जिथे अजित पवारांची राष्ट्रवादी लढत नव्हती, तिथल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केल्याचा संशय भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत ठेवून उपयोग काय, उलट त्यांच्यामुळे नुकसानच होत असल्याची भावना नेत्यांची आहे.

सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुतेंचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी ७४ हजार मतांनी पराभव केला. मोहोळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार आहेत. या मतदारसंघात सातपुते ६३ हजार १५२ मतांनी मागे पडले. माढा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह निंबाळकरांचा शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी १ लाख २० हजार मतांनी पराभव केला.

या मतदारसंघात संजय शिंदे हे दादा गटाचे आमदार आहेत. तिथे निंबाळकर ४१ हजार ५११ मतांनी पिछाडीवर होते. माढ्यात बबनराव शिंदे आमदार आहेत. तिथे निंबाळकर ५२ हजार ५१५ मतांनी मागे पडले. फलटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत. तिथे निंबाळकरांना १६ हजार ९२८ मतांची आघाडी असली तरीही तिथे रामराज नाईक निंबाळकरांच्या गटानं भाजपच्या विरोधात काम केल्याचं उघडपणे बोललं गेलं.

हेही वाचा :

महायुतीच्या रंगमंचावरचे एक अस्वस्थ पात्र : भुजबळ

‘…म्हणून रवी राणांमुळेच नवनीत राणांचा पराभव झाला’ ; बच्चू कडुंचा खळबळजनक दावा!

हे सरकार फक्त 6-8 महिने, नोव्हेंबरला मविआचं सरकार सत्तेत आणायचंय; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकलं