भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या(Congress) यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अमरावती लोकसभा अंतर्गत अमरावती विधानसभेच्या मतदारांबद्दल केलेले एक वक्तव्य आता नव्या वादाला तोंड फोडण्यास कारणीभूत ठरले आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी अमरावती विधानसभेच्या मतदारांबद्दल वक्तव्य करताना त्यांनी मतदारांना जिहादी म्हणून संबोधले होते.
हा लोकशाही आणि निवडणूक आयोगाचा(Congress) अपमान असल्याचा ठपका ठेवत, काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. अशा वक्तव्यातून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू दिसून येतो, त्यामुळे अशा विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी तक्रार अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे काँग्रेसच्या पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी दिली आहे.
देशातील लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची सांगता मोदींच्या शपथविधीनं झालीय. असे असले तरी या निवडणुकीच्या काळात केलेले वक्तव्य आणि त्यावरून होणारे वाद अद्याप उफाळून येताना दिसत आहेत. अशातच अमरावती लोकसभा अंतर्गत अमरावती विधानसभेच्या मतदारांबद्दल केलेले एक वक्तव्य आता नव्या वादाला तोंड फोडण्यास कारणीभूत ठरले आहे. किरीट सोमय्या यांनी अमरावतीच्या मतदारांना जिहादी म्हणून संबोधले होते. यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली असून या संबंधित तक्रार दाखल केली आहे.
सोबतच निवडणूक आयोगाकडे किरीट सोमय्या यांची तक्रार दाखल केली असून यात म्हटलं आहे की, लोकशाहीत मतदान करणे हा सगळ्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्यांना मतदान करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अमरावती शहरासह देशात जातीय दंगल घडवण्याचा हेतू असल्याने अशा व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे, अशी आशयाची तक्रार करण्यात आली आहे.
असेच एक वक्तव्य किरीट सोमय्या यांनी मुंबईतील मुंबादेवीमध्ये निवडणूक काळात केलं होतं. यात मुंबादेवीमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांचा विजय झाला. पण दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचा मोठा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. बूथ 191 मध्ये यामिनी जाधव यांना केवळ एकच मत मिळालं आहे. तर, अरविंद सावंत यांना या बूथमध्ये तब्बल 311 मतं पडली आहेत.
हेही वाचा :
महायुतीच्या रंगमंचावरचे एक अस्वस्थ पात्र : भुजबळ
दोघात नको तिसरा, आता दादांना विसरा! भाजपमध्ये वाढतंय ‘त्या’ नेत्यांचं बळ
हे सरकार फक्त 6-8 महिने, नोव्हेंबरला मविआचं सरकार सत्तेत आणायचंय; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकलं