२१ जून रोजी संपूर्ण राज्यात वटपोर्णिमा साजरी केली जाणार आहे. वटपोर्णिमा (worship)हा भारतीय संस्कृतीतील सण आहे. यादिवशी पत्नी आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, भरभराटीसाठी व्रत करतात. सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा, अशी प्रार्थना करतात. वटपोर्णिमेच्या बायको आपल्या नवऱ्यासाठी व्रत करते.सनातन धर्मात वट सावित्री व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
वैदिक दिनदर्शिकेनुसार, हे व्रत दरवर्षी अमावस्या आणि ज्येष्ठ महिन्याच्या पोर्णिमेला(worship) केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या विशेष दिवशी भगवान विष्णू आणि वटवृक्षाची पूजा केली जाते. असे केल्याने आपल्याला संसारात सुख- समानधान मिळते. पतीच्या दिर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. यावर्षी वट पोर्णिमा कधी आहे? वट पोर्णिमेचे व्रत करण्याचा शूभ मूहूर्त कधी? हे जाणून घेऊया.
वैदिक दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ शुक्ल पक्षाची पोर्णिमा २१ जून रोजी सकाळी ७.३१ मिनिटांनी सुरु होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जून रोजी सकाळी ६.३७ मिनिटांनी समाप्त होईल. या मूहूर्तावर वटसावित्रीची पूजा केली जाते. म्हणजेच २१ जून २०२४ रोजी महिला वटवृक्षाची पूजा करावी, २१ जून रोजी महिलांनी उपवास करावा. याशिवाय २१ जून रोजी ज्येष्ठ पोर्णिमा व्रतदेखील पाळण्यात येणार आहे. या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तयार होत असल्याचे पंचांगात सांगितले आहे. शुभ योग संध्याकाळी ६.४० मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर शुक्ल योग सुरु होईल.
वट सावित्रीचे व्रत महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण भारतात ज्येष्ठ पोर्णिमेच्या दिवशी केले जाते. वटपोर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्षाची पूजा करताना पाच फळे नैवद्य ठेवायचा असतो. वट सावित्रीचे व्रत केल्याने संसारात सुख-समृद्धी प्राप्त होते. वटवृक्षात त्रिमूर्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश राहतात, असे मानले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात वटवृक्षाची पूजा केली जाते.
टीप– वरील माहिती गृहितकांवर आधारित आहे.
हेही वाचा :
रिंकू पाटील ते आरती यादव एक रक्तरंजित प्रवास…….!
“जरांगेंचे समाधान होतच नाही…” सगेसोयऱ्यांबाबत बोलताना असं का म्हणाले गिरीश महाजन
कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का? माजी आमदार अजितदादांची साथ सोडणार