आता चहा पिणेही होणार महाग? भारतीय चहा उद्योग संकटात

भारतातील लोकांना चहा प्यायला आवडते आणि चहाचे उत्पादन आणि वापर या दोन्ही(tea) बाबतीत भारत हा अग्रगण्य देश आहे. चहा उत्पादक देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तर चीन पहिल्या क्रमांकावर येतो.

आसाम आणि दार्जिलिंग चहा(tea) जगभरातील देशांमध्ये प्रसिद्ध आहे आणि स्वस्त पेय असण्याव्यतिरिक्त, चहा लोकांच्या जीवनात इतका एकरूप झाला आहे की त्याला वेगळे करणे जवळजवळ अशक्य आहे. चहाची कमी किंमत हे देखील त्याच्या लोकप्रियतेचे कारण आहे, परंतु यंदा चहा पिणेही खिशाला जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.

उत्तर भारतीय चहा उद्योगाला प्रतिकूल हवामानामुळे चालू पीक वर्षाच्या जूनपर्यंत सहा कोटी किलोग्रॅम उत्पादनाची कमतरता भासत आहे. एका संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीशी तुलना केली असता देशातील चहाचे उत्पादन कमी होत असल्याचे दिसते. अधिकारी म्हणतात की पहिल्या आणि दुसऱ्या हंगामात वर्षातील उच्च दर्जाचा चहा तयार होतो. चहाचे कमी उत्पादन चहा उत्पादकांच्या महसुलावर परिणाम करेल आणि चहाच्या किमती वाढू शकतात.

उत्तर भारतीय चहा उद्योगात गुंतलेली आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहेत. मे महिन्यातील अतिउष्णता आणि पावसाचा अभाव, अतिवृष्टी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे चहाच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. टी असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीएआय) अध्यक्ष संदीप सिंघानिया यांनी अंदाज व्यक्त केला आहे की जूनपर्यंत चहा पिकाचे एकत्रित नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा कोटी किलोग्रॅम असू शकते.

ते म्हणाले, “असोसिएशनच्या सदस्य चहाच्या बागांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहाच्या बागा मागील वर्षाच्या तुलनेत मे 2024 मध्ये अनुक्रमे सुमारे 20 टक्के आणि 40 टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे. टी बोर्ड ऑफ इंडिया काढलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की एप्रिल 2024 पर्यंत, आसाममध्ये चहाचे उत्पादन सुमारे 8 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 13 टक्क्यांनी घटेल.

हेही वाचा :

 व्हॉट्सॲप वापरून बुक करता येणार मेट्रो तिकीट

पुण्यात रीलसाठी तरुणांकडून जीवघेणा स्टंट; Viral व्हिडिओ पाहून बसेल धक्का

दीपिकाच्या प्रेग्नन्सीवर राणाची मिश्किल टिप्पणी; अभिनेत्री म्हणाली, “तीन वर्ष…”