एका पोलीस(police) कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवत पोलीस अधिकाऱ्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलंय. हा गुन्हा केल्याचे वृत्त आहे. या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.
तेलंगणा पोलिसातील(police) उपनिरीक्षक भवानी सेन यांना बुधवारी अटक करण्यात आली. एका महिला कॉन्स्टेबलवर बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना १६ जून रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. जयशंकर भुलापल्ली जिल्ह्यातील ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालसेवारम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने ही तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये पीडितीने संबंधित पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार करण्यापूर्वी तिला त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने धमकावल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाही, तर या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देखील त्याने पीडितेला दिली होती. घाबरलेल्या पीडितेने वरिष्ठांकडे तक्रार केली होती.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात आरोपीचा गुन्हा स्पष्ट झाला. त्यानंतर आरोपी एसआयवर कारवाई करण्यात आली. आयजी एव्ही रंगनाथ यांनीही सेन यांची पोलीस सेवेतून कायमची हकालपट्टी करण्याचे आदेश जारी केल्याची माहिती मिळत आहे.
तसेच, त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत म्हणजेच आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे आता कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायद्याचे रक्षण करणारेच भक्षक बनले, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे मदत मागायची हा प्रश्न देखील या घटनेनंतर निर्माण होत आहे.
हेही वाचा :
व्हॉट्सॲप वापरून बुक करता येणार मेट्रो तिकीट
पुण्यात रीलसाठी तरुणांकडून जीवघेणा स्टंट; Viral व्हिडिओ पाहून बसेल धक्का
दीपिकाच्या प्रेग्नन्सीवर राणाची मिश्किल टिप्पणी; अभिनेत्री म्हणाली, “तीन वर्ष…”