ओबीसींच्या हक्कासाठी उपोषणासाठी बसलेले लक्ष्मण हाके(political career) यांनी ५४ लाख कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी सरकारच्या शिष्टमंडळाकडे केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. ज्यांच्या नोंदी नाहीत ते लोक नोंदी असणाऱ्यांचं आरक्षण रद्द करण्याची मागणी करत आहे.. पण आम्ही १४ तारखेपर्यंत शांत आहोत, त्यानंतर दाखवून देतो असं मनोज जरांगे म्हणाले.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मंडल कमिशनने कशाच्या आधारावर(political career) ओबीसींना दिलं? १४ टक्के दिलं होतं ते १६ टक्के कसं वाढवलं? यावर आता विचार करावा लागणार आहे. ते लोक ५४ लाख नोंदी रद्द करा म्हणत आहेत. आता तरी मराठ्यांच्या नेत्यांचे डोळे उघडले की नाही? झोपेतून जागे व्हा, असं आवाहन त्यांनी केलं.
”आमच्या ५४ लाख नोंदी खोट्या असतील तर ओबीसींचं आरक्षणच खोटं आहे. सगळे ओबीसी नेते आज उघडे पडले आहेत.. तुम्ही असं करणार असाल तर भविष्यात मंडल आयोगाला चॅलेंज होईल, मंडल कमिशन चॅलेंज होतं आणि रद्दही होतं.. परंतु ती वेळ आज आली नाही. आमच्या मानेवर कुऱ्हाड असेल तर आम्ही शांत बसणार नाही.” असंही जरांगे म्हणाले.
जरांगे पाटील म्हणाले की, आज या ओबीसी नेत्यांकडून शिकूया की जातीवाद काय असतो, आपल्या मराठा नेत्यांना आता घालून-पाडून बोलणं थांबवूया.. ते त्यांच्या कसल्याही नेत्यांना चांगलं म्हणाएत त्यामुळे आपणही आपल्या नेत्यांना बळ दिलं पाहिजे. आपल्या ओरिजनल नोंदी आहेत, आपलं सातबाऱ्यावरचं नाव काढून त्यांचं नाव लावा म्हणतेत.. पण हे होणार नाही.
”सरकारने हैदराबाद संस्थान, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट लागू केलं पाहिजे. त्यांना फूस देता, आंदोलनही उभं तुम्हीच करता.. मरठ्यांना डुबवायचं काम केलं तर तुम्हाला बुडवणारच..” असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
छगन भुजबळ यांच्याविषयी बोलताना जरांगे म्हणाले, हे आंदोलन त्यांनीच उभं केलं आहे, तेच माणसं पाठवत आहेत आणि गाड्या पाठवत आहेत. त्यांना राजकीय करिअरमधून उठवलं नाही तर बघा.. आमचं भविष्य वाट्टोळं करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लढणारालाही कळत नाही, कुणासाठी लढतोय.. तुमचं एसटीचं आरक्षण मागा, ते आतापर्यंत मिळालं असतं.
हेही वाचा :
केजरीवालांना या अटींवर जामीन, आज होणार सुटका
एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश?; अधिकृत प्रतिक्रियाही दिली
मोठी घडामोड; लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी गोंधळ आणि घोषणाबाजी