ओबीसींच्या हक्कासाठी जालन्यातल्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचं दहा दिवसांपासून उपोषण(political) सुरु आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
शिष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक नेत्यांचा(political) समावेश होता. यावेळी छगन भुजबळांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची मागणी केली.
भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडेंनी कोणालाही विरोध केला नव्हता, तरीही त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केलं. असं जर असेल तर मग आम्हालाही राजकीय आरक्षण पाहिजे. सरकारने लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावं, असं भुजबळ म्हणआले.
जातनिहाय जनगणनेबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की, जातनिहाय जनगणनेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मनोज जरांगे यांचं नाव न घेताल भुजबळांनी आरोप केला की, तो तिकडे बसून जातीवाद करत आहे. त्यामुळे इथून पुढे ओबीसींना एकत्रित राहावं लागेल, नाहीतर आपलं आरक्षण टिकणार नाही, असंही भुजबळ म्हणाले.
हेही वाचा :
या’ भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे…
मनोज जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ…
लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्मांतरण करणार का?