पंढरपूर : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एकीकडे मराठा समाजाने ओबीसीतून(Cabinet) आरक्षणाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या मागणीला विरोध केला आहे. या मुद्द्यावरून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आता या वादात मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर(Cabinet) ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला बसले होते. लक्ष्मण हाके यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. यानंतर मराठा क्रांती मोर्चाने मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध कायम ठेवला आहे. लक्ष्मण हाके यांचं उपोषणस्थळ वडीगोद्री येथूनही छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विरोध कायम ठेवला. यावरून मराठा क्रांती मोर्चाचे धनाजी साखळकर यांनी आक्रमक भूमिका घेत छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर म्हणाले की, ‘मुख्यमंत्री शिंदे, तुम्हाला विनंती करतो की, संवैधानिक पदावर बसून कुठल्याही समाजाविरोधात आकस निर्माण करतो. तेच मंत्री मराठा समाजाला सतत टार्गेट करत असेल. मराठा समाजाच्या मागणीला विरोध करत असेल. अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. यामुळे महाराष्ट्रसुद्धा शांत राहील’.
‘छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री संवैधानिक पदावर राहून मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी उभं करत असेल, या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशाराही साखळकर यांनी दिला.
हेही वाचा :
काँग्रेसच्या मोर्चातून धैर्यशील मानेंचा ‘शक्तीपीठ’वरून शिंदे सरकारला घरचा आहेर!
लक्ष्मण हाकेंच्या सर्व मागण्या मान्य, उपोषण अखेर मागे
मोठी बातमी! छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी