भरधाव टेम्पोने झोमॅटो बॉयला फरफटत नेले, जागी झाला मृत्यू

डोंबिवली जवळील खोनी पलावा परिसरात शनिवारी रात्री टेम्पोच्या धडकेत झोमॅटो बॉयचा(zomato delivery) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिकअप टेम्पो चालकाने क्लिनरला गाडी चालवायला दिली. क्लिनर टेम्पो चालवत असताना त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका झोमॅटो कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली.

तसेच गाडी खाली आलेल्या झोमॅटो(zomato delivery) डिलिव्हरी बॉयला काही अंतरापर्यत फरफटत नेले. या अपघातात या झोमेटो बॉय चा मृत्यू झाला आहे. सौरभ यादव असे या मयत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीसांनी क्लिनर आतिष जाधव याला ताब्यात घेतले.

अपघाता दरम्यान क्लिनरचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या सात ते आठ दुचक्याना टेम्पोने धडक दिली. या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचा क्लिनर अतिष जाधव याला ताब्यात घेतले.

जमावाची समजूत काढली. पिकप टेम्पो चालकाने हा क्लिनरला चालवायला दिल्याने हा अपघात घडला .मात्र या अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला तर सात ते आठ गाड्यांचे नुकसान झाले . त्यामुळे क्लीनर्र सह टेम्पो मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जातेय .

हेही वाचा :

अराजकाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रातील जातकलह

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

पुढचे चार दिवस महत्वाचे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?